Search This Blog

Monday, 2 June 2025

2 ते 20 जून या कालावधीत विशेष कुष्ठरोग शोध अभियान


 ते 20 जून या कालावधीत विशेष कुष्ठरोग शोध अभियान

चंद्रपूर,दि. 2 जून : भारत सरकारने कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याकरीता सर्व राज्यांना त्यांच्या प्रत्येक जिल्ह्याकरीता "जिल्हा धोरणात्मक कृती आराखडातयार करण्याबाबत सुचना दिल्या होत्याचंद्रपर जिल्ह्यातील कुष्ठरुग्णांचे प्रमाण लक्षात घेवून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या मार्गदर्शनात "जिल्हा धोरणात्मक कृती आराखडातयार करण्यात आलाजिल्ह्यात नवीन कुष्ठरुग्णांचे प्रमाण शुन्यावर आणण्याकरीता सन 2023 ते 2027 या चार वर्षाच्या कालावधीत दर तीन महिन्यांनी विशेष कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

              यातील तिसरी फेरी जुन ते 20 जुन 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहेतसेच राजुरा तालुक्यातील कुष्ठरोगाकरीता संवेदनशील असलेल्या 20 गावात पिपल्स लेप्रा फाउंडेशनहैद्राबाद या एन.जी.मार्फत सर्व्हेक्षण राबविण्यात येत असून संपूर्ण महाराष्ट्रात कुष्ठरोगासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत राबविण्यात येणारी ही पहिली मोहीम ठरली.

            सदर मोहीम 347 गावात राबविण्यात येणार असून मोहिमेदरम्यान 480 टीम मार्फत लक्ष 39 हजार 198  घरांना भेटी देण्यात येईलयात 5 लक्ष 80 हजार 924   नागरीकांची तपासणी करण्यात येणार आहेसदर टीम घरांमधील सर्व सभासदांची कुष्ठरोग आजारासाठी शारिरीक तपासणी करण्यात येणार आहेत्यामध्ये त्वचेवर फिकट / लालसर बधीर चट्टात्याठीकाणी घाम न येणेजाड बधिर तेलकट /चकाकणारी त्वचात्वचेवर गाठी असणेकानाच्या पाळया जाड होणेभुवयांचे केस विरळ होणेडोळे पूर्ण बंद करता न येणेतळहातावर मुंग्या येणेबधिरपणा अथवा जखमा असणेहाताची व पायाची बोटे वाकडी असणेहात मनगटापासुन किंवा पाय घोटयापासुन लुळा पडणेत्वचेवर थंड व गरम संवेदना न जानवणेहात व पायामध्ये अशक्तपणा जाणवणेहातातुन वस्तु गळून पडणेचालताना पायातुन चप्पल पडणेइत्यादी.

            विशेष कुष्ठरोग शोध मोहीमेत 347 गावातील सर्व नागरीकांनी टीम मार्फत तपासणी करून घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायतमीना साळुंखेजिल्हा शल्यचिकित्सक डॉमहादेव चिंचोळेजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारे व सहाय्यक संचालक (कुष्ठरोगडॉसंदीप गेडाम यांनी केले आहे.

००००००

 

No comments:

Post a Comment