Search This Blog

Thursday, 12 June 2025

गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये मिळणार प्रवेश

 गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये मिळणार प्रवेश

              चंद्रपूर,दि. 12 जून इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष कार्यक्रमातंर्गत गोवारी समाजाच्या  विद्यार्थ्यांना शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळामध्ये इयत्ता पासून इयत्ता 12 वी पर्यंत शिक्षण देण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

             त्यासाठी संचालकइतर मागास बहुजन कल्याण यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये 1 ते 12 वीमध्ये प्रवेश घेतलेल्याघेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची  जाहीर सूचनेद्वारे माहिती मागवावीतसेच प्रत्येक शासकीय अनुदानित शाळांच्या पातळीवर प्रस्तुत योजनेचा लाभ घेऊ  इच्छिणाऱ्या मुलांची  प्रवेश अर्ज व पालकाचे संमतीपत्र सहायक संचालकइतर मागास बहुत कल्याण यांनी घ्यावेतत्यानंतर सहायक संचालकांनी किमान 100 विद्यार्थ्यांची निवड करावी  व निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जवळच्या शहरांतील इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळेत सन 2026   या चालू शैक्षणिक वर्षापासून  प्रवेश मिळवून देण्याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही पार पाडावी.

त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील इच्छुक नामांकित शाळेतील संस्थापक/प्राचार्यांनी सदर प्रस्ताव सहायक संचालकइतर मागास बहुजन कल्याणचंद्रपूर कार्यालयात सादर करावेजेणेकरुन नागपूर विभागातील गोवारी समाजाच्या विद्यार्थ्यांना  शहरांतील इंग्रजी माध्यमाचा नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण बाबतची माहिती उपलब्ध करुन देणे सोईचे होईल.

००००००

No comments:

Post a Comment