Search This Blog

Tuesday, 24 June 2025

26 जून रोजी आयटीआय मध्ये शिकाऊ /रोजगार भरती मेळावा


 26 जून रोजी आयटीआय मध्ये शिकाऊ /रोजगार भरती मेळावा

चंद्रपूरदि. 24 : शासकीय  औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चंद्रपूर येथे गुरुवार दि. 26 जून  रोजी सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय " शिकाऊ उमेदवारी मेळावा तसेच रोजगार मेळावा"आयोजित करण्यात आलेला आहे. सदर मेळावा सर्व व्यवसायाच्याआजी व माजी आयटीआय पास व शिकत असलेल्या विद्यार्थ्यांकरिता असून महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी येणार आहे.

शिकाऊ उमेदवारी करिता निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार कंपनीतर्फे सोयी सुविधा उपलब्ध राहतील. सदर मेळाव्याचे आयोजन बीटीआरआय चंद्रपूर यांच्या सहकार्याने होत असून याकरिता इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी योगेश धवणे (9405912096) लोखंडे मॅडम (9423690138) यांच्याशी संपर्क साधावा,  असे आवाहन संस्थेचे प्राचार्य श्री. वानखेडे व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी केले.

 ००००००

No comments:

Post a Comment