Search This Blog

Saturday, 21 June 2025

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण




 

पालकमंत्र्यांच्या हस्ते सहा वाहनांचे लोकार्पण

चंद्रपूरदि. 21 : महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाला सहा वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या वाहनांचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते करण्यात आले.

नियोजन भवन येथे आयोजित या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवारमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहपोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शनअतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपविभागीय अधिकारी संजय पवारअजय चरडेरविंद्र मानेतहसीलदार विजय पवारप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारजिल्हा नियोजन अधिकारी संजय कडूसुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त असलेल्या क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारीउपविभागीय अधिकारी व तहसीलदारांनात्यांच्या जुन्या निर्लेखित वाहनांच्या बदली स्वरुपात नवीन वाहने खरेदी करण्यास शासनाने मंजुरी दिली होती. त्यानुसार एकूण सहा महिंद्रा बोलेरो न्युओ या वाहनांची खरेदी करून सदर वाहने जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली आहेत. ही वाहने चंद्रपूरगोंडपिपरीमुलवरोरा येथील उपविभागीय अधिकारी तथा राजुरा आणि कोरपना येथील तहसीलदारांना देण्यात येणार आहे.

000000

No comments:

Post a Comment