Search This Blog

Monday, 16 June 2025

21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन

चंद्रपूर,दि. 16 :  संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून घोषित केला आहेत्याअनुषंगाने आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी सकाळी 7 ते 8या वेळेस संपूर्ण देशात एकाच वेळी साजरा करण्यात येणार आहे.

 व्यक्तीच्या शारिरीक आणि आध्यात्मिक विकासासाठी योग विद्या सहाय्यभुत आहेया कार्यक्रमाच्या आयोजनात युवा वर्ग तसेच सर्वसामान्य व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणात सामावून घ्यायचे आहेया कार्यक्रमामध्ये शाळा महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांकडून तसेच एन. एस. एस., नेहरु युवा केंद्र इयुवा संघटनांमार्फत योगा संबंधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधुन मुख्य शासकीय योग दिनाचा कार्यक्रम 21 जुन 2025 रोजी सकाळी 7 वाजता जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथील वातानुकुलीत बॅडमिंटन हॉल मध्ये घेण्यात येणार आहेया कार्यक्रमाकरिता सर्व लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकारी तसेच पतंजली योग समितीचंद्रपूरपतंजली  योगपीठ संस्थाचंद्रपूर व जिल्हा योग संघटना चंद्रपूर चे पदाधिकारी व शहरातील नागरिक /खेळाडू उपस्थित राहणार आहेत.

           तरी सर्व नागरीकयोगसाधकजेष्ठ नागरिकांनी 21 जून 2025 रोजी सकाळी 6.30 वाजतर जिल्हा क्रीडा संकुलचंद्रपूर येथील बॅडमिंटन हॉल येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंड यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment