Search This Blog

Tuesday, 17 June 2025

धरती आबा जनभागीदारी अभियानचा शुभारंभ

 

धरती आबा जनभागीदारी अभियानचा शुभारंभ

Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते हिरवी झेडी दाखवून उद्दघाटन

चंद्रपूरदि. 17 : भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून जनजातीय गौरव वर्षानिमित्त केंद्र सरकारने आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबध्द कार्यक्रम हाती घेतले आहेतयात एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणून धरती आबा अभियान – एक केंद्रित जागरूकता आणि संपृक्तता मोहीम’ तसेच ‘धरती आबा कर्मयोगी - एक क्षमता बांधणी कार्यक्रम’ या दोन अभियानाद्वारे लक्ष्यित बहुक्षेत्रीय सेवा वितरणासाठी एक मोठी मोहीम आखलेली आहेआदिवासी भागांमध्ये पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करणे या उपक्रमांचा उद्देश आहेया अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज करण्यात आला.

जनजातीय गौरव वर्ष 2025 चा भाग म्हणून शेवटच्या घटकापर्यंतच्या आदिवासी समुदायांना वैयक्तिक लाभांची घरपोच सेवा देण्यासाठी केंद्र सरकारच्या देशव्यापी मोहीमेअंतर्गत गाव आणि क्लस्टरस्तरीय शिबिरांचे आयोजन केले आहेयासाठी प्रत्यक्ष ग्रामस्तरावर आधार कार्डरेशनकार्डआयुष्मान भारत कार्डजातीचे प्रमाणपत्रपीएम-किसानजनधनखातेकाढणे अशा सेवा देण्यात येणार आहेतही शिबिरे स्थानिक प्रशासनफ्रंटलाइन कर्मचारी आणि विविध शासकीय विभागांच्या सेवांचे अभिसरण यांच्या सक्रियसह भागातून चालतीलपात्र आदिवासी व्यक्ती आणि कुटुंबापर्यंत लाभ पोहोचविणे हा या शिबिरांचा उद्देश आहेया शिबिरांचे आयोजन 15 ते  30 जून 2025 दरम्यान करण्यात आले आहे.

             त्याअनुषंगाने जिल्हयामध्ये धरती आबा जनभागीदारी अभियानाची माहिती प्रस्तुत करण्यासाठी प्रचार वाहणे तयार केली आहेतया वाहनांना जिल्हाधिकारी विनय गौडा जीसी., व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी पुलकित सिंह यांच्या हस्ते हिरवी झेडी दाखवून शुभारंभ करण्यात आला आहेया प्रसंगी मनपा आयुक्त विपीन पालीवालप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारसहाय्यक प्रकल्प अधिकारी गिरीश पोळ उपस्थित होते.

           अभियानाच्या माध्यमातून आयोजित संपृक्तता शिबीरांमध्ये मोठया संख्येने सहभागी होऊन शासकीय सेवांचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हधिकारी विनय गौडा यांनी सर्व आदिवासी बांधवांना केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment