Search This Blog

Thursday, 26 June 2025

15 जुन ते 31 जुलैपर्यंत सिकलसेल आजार जनजागृती अभियान


15 जुन ते 31 जुलैपर्यंत सिकलसेल आजार जनजागृती अभियान

          चंद्रपूरदि. 26 :   राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत 15 जुन ते 31 जुलै पर्यंत चंद्रपुर जिल्ह्यात सिकलसेल आजार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहेयानिमित्त आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रमांचे  आयोजन करण्यात येत आहेअनुवंशिक आजार असलेल्या सिकलसेल आजाराचे रुग्ण प्रामुख्याने आदिवासी भागात आढळतातया आजारावर अद्यापही कोणताही कायमस्वरूपी उपचार नाहीया आजाराने बाधित रुग्ण व्यक्तींवर   जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थास्तरावर मोफत औषधोपचार केले जातात. या आजाराचे संक्रमण पुढील पिढीत होऊ नये, यासाठी सिकलसेल आजार नियंत्रण जनजागृती उपक्रम राबविला जात आहे.

सदर उपक्रमामध्ये सिकलसेल आजाराची अचुक माहितीआजाराची लक्षणेप्रकारऔषधोपचारआजार टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी याबाबत प्रत्येक गावात वैद्यकिय अधिकारीसमुदाय आरोग्य अधिकारीआशा स्वयंसेविका यांच्यामार्फत माहिती देणेआदिवासी आश्रम शाळाजिशाळा व महाविद्यालयात या आजाराबाबत जनजागृती करणेरॅलीचर्चासत्रकार्यशाळाव चाचणी शिबिराचे आयोजन करणेप्रसार माध्यमांतुन सिकलसेल आजार जनजागृतीतपासणी व औषधोपचाराबाबत माहिती प्रसारित करणे असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

सिकलसेल आजाराची तीव्रता : सिकलसेलग्रस्त रुग्णांना वारंवार रक्त संक्रमणाची गरज भासतेसिकलसेल वाहक स्त्री-पुरुषांचा आपसात विवाह झाल्यास त्यातून सिकलसेलग्रस्त रुग्ण किंवा वाहक मुल जन्माला येण्याची दाट शक्यता असतेत्यासाठी विवाहपुर्व सिकलसेलची चाचणी करून घेणे आवश्यक आहेतसेच अंतिम निदानासाठी HPLC तपासणी घ्यावी. जिल्ह्यात सर्व शासकिय आरोग्य संस्था स्तरावर  औषधोपचार व HPLC चाचणीची सोय उपलब्ध आहे. सर्व सिकलसेल आजारग्रस्त रुग्णांना प्रामुख्याने फॉलिक अॅसिडव्हिटॅमिन सी तसेच जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्था स्तरावरून हायड्रॉक्सियुरिया अशी  मोफत औषधे दिली जातात.

सिकलसेलग्रस्तांना सुविधा : या आजाराचे गांर्भीय लक्षात घेऊन सिकलसेलग्रस्त रुग्णांना अनेक शासकिय सुविधा देण्यात येतातसंजय गांधी निराधार योजनेतुन दरमहा 1500 रुपये मानधनदहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना प्रति तास जादा 20 मिनिटेमोफत रक्त संक्रमण कार्डदिव्यांग प्रमाणपत्र युडीआयडी कार्डतसेच आवश्यकता असल्यास मोफत गर्भजल परिक्षण सुविधाउपचारासाठी एका मदतनीसासह मोफत बस प्रवासतसेच रेल्वे प्रवासात 50 टक्के सुट असा लाभ देण्यात येत आहे.

 प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सिकलसेल रुग्णांकरीता हिपरिप्लेसमेंटची सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेयाचा लाभ जिल्ह्यातील सर्व रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment