Search This Blog

Thursday, 19 June 2025

आदिवासी बांधवांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी विनय गौडा




 

आदिवासी बांधवांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø लोहारा (ताचंद्रपूरयेथे धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन

चंद्रपूरदि. 19 : जनजातीय गौरव वर्षानिमित्त केंद्र सरकारने आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी धरती आबा अभियान’ सुरू केले आहेया अंतर्गत जिल्हाभरात विविध ठिकाणी 67 शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहेजिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी या शिबिराच्या माध्यमातून शासकीय सेवांचा लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांनी केले.

लोहारा (ताचंद्रपूरयेथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपूरच्या वतीने आयोजित धरती आबा जनभागिदारी अभियानचे उद्घाटन करतांना ते बोलत होतेयावेळी प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहउपविभागीय अधिकारी संजय पवारतहसीलदार विजय पवारगटविकास अधिकारी श्रीमती भांगरेप्रकल्प अधिकारी विकास राचेलवारसहायक प्रकल्प अधिकारी गिरीश पौळलोहाराच्या सरपंचा किरण चालखुरेउपसरपंच शिलिक मरसकोल्हेअनिल कुंटेवार आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री धरती आबा अभियानाची सुरूवात नुकतीच करण्यात आली आहेअसे सांगून जिल्हाधिकारी श्रीगौडा म्हणालेकेंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांसोबतच आदिवासी बांधवांसाठी असलेल्या विविध योजना एकत्रितरित्या ग्रामस्तरावर उपलब्ध व्हाव्यातया उद्देशाने जिल्ह्यात एकूण 67 शिबिरे घेण्यात येणार आहेतयात प्रत्यक्ष ग्रामस्तरावर आधारकार्डरेशनकार्डआयुष्मान भारत कार्डजातीचे प्रमाणपत्रपीएम-किसानजनधनखातेकाढणे अशा विविध सेवा देण्यात येणार आहेतसोबतच आदिवासी बांधवांना पायाभूत सुविधासामाजिकआर्थिकशैक्षणिक सोयीसुविधा देणे हे मुख्य उद्दिष्ट आहेविशेष म्हणजे त्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाहीग्रामस्तरावरच या सुविधा शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणालेलोहारा येथे धरती आबा जनभागिदारी अभियानचे चांगले आयोजन प्रकल्प कार्यालयाने केले आहेजिल्हा परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजनाजलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणी व इतर योजना गरजू लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतअशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकेतून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार म्हणालेधरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानात चंद्रपूर जिल्ह्यातील 167 गावे समाविष्ट आहेतयात चंद्रपूर प्रकल्प कार्यालयांतर्गत 115 तर चिमूर प्रकल्प कार्यालयांतर्गत 52 गावांचा समावेश आहेया अभियानात 17 शासकीय विभागाच्या 25 प्रकारच्या सेवा देण्यात येईलपहिल्या टप्प्यात 15 ते 30 जून या कालावधीत शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेलोहारा व परिसरातील आजुबाजूच्या गावक-यांनी शिबिराचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रे काढून घ्यावीतअसे आवाहन श्रीराचेलवार यांनी केले.

यावेळी मान्यवरांनी विविध स्टॉलची पाहणी केलीकार्यक्रमाचे संचालन शिक्षिका जयू राऊत यांनी तर आभार मुख्याध्यापक रामदास खवशी यांनी मानलेकार्यक्रमाला अधिकारी – कर्मचारी तसेच गावकरी उपस्थित होते

नागरिकांना प्रमाणपत्रांचे वाटप : यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रियंका मरापेपल्लवी बोधेआबाजी नैतामसुनील कुमरे यांना शिधापत्रिका वाटप तर पोचू सोयामअशोक मेश्रामविशाल गेडामप्रफुल देवगडेविजय भोगेकार यांना वनहक्क अंतर्गत सातबारा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

०००००००

No comments:

Post a Comment