Search This Blog

Friday, 13 June 2025

तालुका स्तरावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण




 तालुका स्तरावर विशेष आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रशिक्षण

चंद्रपूरदि. 13 जून आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने तसेच मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने चिमूर व नागभीड तालुक्यांमध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या वतीने विशेष आपत्ती प्रतिसाद दल प्रशिक्षण घेण्यात आले.  

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी. सी., निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यातयाबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. यात प्राथमिक बचाव व शोध मोहीम, प्राथमिक उपचार व सीपीआरपूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृतीआपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्यआपत्कालीन उपकरणांचा वापर व सुरक्षाविधी यांचा समावेश होता.

या प्रशिक्षणामध्ये महसूलपोलीसआरोग्यशिक्षणकृषीआणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकारीकर्मचारी व स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविलाचिमूर व नागभीड तालुक्यात  राज्य आपत्ती प्रतिसाद दल ,नागपुरचे  पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ भंडारे यांच्या नेतृत्वात रेस्क्यूवर प्रशिक्षण देण्यात आले. चिमूर तहसील कार्यालयामध्ये इम्प्रोवाईज डिवाइसस्टॅंडर्ड डिवाइस, एमएफआरमध्ये सीपीआर व विविध प्रकारचे बँडेज कशा प्रकारे बांधतात, अशा बाबींवर आपत्ती व्यवस्थापन विषयक  माहिती  देण्यात  आलीतसेच चिमूर आणि नागभीड तहसील मधील उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणी करण्यात आली .

पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रात्यक्षिक महत्त्वाचे आहेया प्रशिक्षणातील माहिती आपापल्या तालुक्यातील इतरांना देण्यासाठी अतिशय गांभीर्याने प्रशिक्षण शिकून घ्या.  पूर परिस्थितीत नागरिकांचे जीव वाचविणे आणि त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करणे गरजेचे असल्याचे नागभीडचे तहसीलदार प्रताप वाघमारे यांनी सांगितले.

चिमूर येथे पार पडलेल्या प्रशिक्षणावेळी  अप्पर जिल्हाधिकारी संतोष थिटे,  उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे  यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्रीधर राजमानेनायब तहसीलदार सूर्यकांत पाटीलतसेच नागभीड येथे तहसीलदार प्रताप वाघमारेगटविकास अधिकारी स्नेहल लाडतालुका कृषी अधिकारी श्री. पुजारीनायब तहसीलदार उमेश कावळे व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

अधिक प्रशिक्षण सत्रे व मॉकड्रील घेण्याचे नियोजन : या उपक्रमामुळे जिल्ह्यातील सर्व स्तरांवरील यंत्रणांना आपत्ती काळात योग्य ती तयारी ठेवता येणार असूनआपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करता येईलआगामी काळात अधिक प्रशिक्षण सत्रे व प्रत्यक्ष मॉकड्रिल्स घेण्याची योजना आखण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांनी दिली.

००००००

No comments:

Post a Comment