Search This Blog

Wednesday, 25 June 2025

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘जागतिक आलिम्पिक डे’

 

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जागतिक आलिम्पिक डे

            चंद्रपूर,दि 25 : जगातील सर्वोत्तम क्रीडा महोत्सव ऑलिम्पिक विषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या निर्देशानूसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या वतीने जागतिक आलिम्पिक डे साजरा करण्यात आला. यावेळी  खेळाडूंची भव्य रॅली चंद्रपूर शहरात काढण्यात आलीबॅनर व स्लोगनसह असंख्य खेळाडूंनी या रॅलीला उस्फूर्त प्रतिसाद दिला.

      त्यानंतर जिल्हा क्रीडा संकूल येथे चर्चासत्रपरिसंवाद व कार्यशाळा अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेमुख्य कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड होतेयाप्रसंगी तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरेजयश्री देवकर, संदीप उईके,  क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळेमनोज पंधराम, ,नंदु अवारे, मोरेश्वर गायकवाड, फुटबॉल प्रशिक्षक अभिषेक डोईफोडेखेलो इंडीया प्रशिक्षक रोशन भुजाडे आदी उपस्थित होते.

आलिंम्पिसाठी भारताचे स्वप्न व खेळाडूंची भूमिका यावर अविनाश पुंड यांनी मार्गदर्शन केलेकार्यकमाचे प्रास्ताविक संदीप उईके यांनीसंचालन मोरेश्वर गायकवाड यांनी तर आभार रोशन भुजाडे यांनी मानलेसंपूर्ण जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थाविविध सामाजिक संस्थाऔद्योगिक प्रतिष्ठाने यांच्याकडून जागतिक आलिम्पिक डे साजरा करण्यात आला.

००००००

No comments:

Post a Comment