Search This Blog

Wednesday, 4 June 2025

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

 

अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह प्रवेश प्रक्रिया सुरू

चंद्रपूरदि. 4 जून :   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचंद्रपुर अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्याकरीता  मुलांचे 12 (चंद्रपुर - 2, राजुरा - 2, गडचांदूरकोरपनाजिवतीसिंदेवाहीमुलसावलीपोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एकव मुलींचे 11 (चंद्रपुर - 2, राजुरागडचांदूरकोरपनाजिवतीसिंदेवाहीमूलसावलीपोंभुर्णा व गोंडपिपरी येथे प्रत्येकी एकअसे एकूण 23 वसतिगृह कार्यरत आहेतसन 2025-26 करीता रिक्त जागांवर प्रवेशाकरोता www.swayam.mahaonline.gov.in या प्रणालीवर फक्त ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावा.

जिल्हास्तरावर चंद्रपुर येथे मुलांचे व मुलींचे असे एकूण वसतिगृह कार्यरत असून या वसतिगृहांमध्ये इयत्ता 11 ते पदवीपदव्युत्तर तसेच व्यावसायीक अभ्यासक्रमांस प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश मिळणार आहेतसेच उर्वरीत 19 वसतिगृहांमध्ये वर्ग वी पासून पुढे शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे प्रवेश दिला जाणार आहे.

वरील संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सुचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे व त्यात दिलेल्या कागदपत्रांची जोडणी करण्यात यावीवसतिगृहातील ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाहीअशा विद्यार्थ्यांनी आपला अर्ज फक्त रिनीव्हल करायचा आहेनविन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज भरलेल्या दिनांकापासुन आपण निवडलेल्या वसतिगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावे.

वसतिगृह प्रवेशाचे संकेतस्थळ पदवीपदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 31 जुलै 2025  पर्यंत व व्यावसायीक अभ्यासक्रमांकरीता 31 ऑगस्ट 2025 पर्यंत सुरू राहणार आहेत्यामुळे विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज सादर करावेतअसे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment