Search This Blog

Monday, 23 June 2025

शिवगर्जनेने शाळेत बालकांचे पहिले पाऊल






 

शिवगर्जनेने शाळेत बालकांचे पहिले पाऊल

Ø विद्यार्थी घडले तरच देश घडेल – जिल्हाधिकारी विनय गौडा

Ø दाताळा येथील जि.प. उच्च प्राथ. शाळेत विद्यार्थ्यांचा जल्लोषात प्रवेशोत्सव

चंद्रपूरदि. 23 : ‘महाराजराजनीती धुरंधरप्रौढप्रताप पुरंदरसिंहासनाधिश्वरमहाराजाधिराजराजा शिवछत्रपती महाराजांचाविजय असोविजय असोविजय असो…’ अशा पहाडी आवाजात 7 वी ची विद्यार्थीनी कार्तिकी मुंगले हिने शिवगर्जनेचा जयघोष केला आणि विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले.

दाताळा येथील पी.एम.श्रीजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीयांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पार पडलायावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणेदाताळाच्या सरपंचा सुनिता देशकरशाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमन दोनाडकरशिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकारशाळेचे मुख्याध्यापक लटोरी मोहितकरशिक्षिका सुनिता पावडेवंदना वनकरअर्चना चिंतावारशिक्षक राजू लांजेकरकेशर चकोले यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणालेआजपासून शैक्षणिक सत्र 2025-26 ला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहेपहिल्यांदा शाळेत पाऊल टाकण्याचा क्षण अविस्मरणीय असतोत्याचे महत्व जीवनभर असतेशिक्षणामुळेच स्वत:चाकुटुंबाचा तसेच सामाजिकआर्थिक व सर्वांगीन विकास होण्यास मदत होतेसर्वांना चांगले शिक्षण देणे ही आपली प्राथमिकता आहेकोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाहीअसा शासनाचा मानस आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावेजेणेकरून स्पर्धेच्या या युगात आपलाही विद्यार्थी पुढे राहीलआजचा विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहेविद्यार्थी घडला तरच देश घडेलशाळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन निधीची कमतरता पडू देणार नाहीविद्यार्थ्यांनोचांगला अभ्यास करातरच मोठ्या पदावर पोहचालअसे म्हणत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्यातसेच पालकांनीसुध्दा मुलांना चांगले शिक्षण द्यावेअसे आवाहनही त्यांनी केलेयावेळी शाळेकरीता मिळालेल्या स्मार्ट टीव्हीचे लोकार्पण जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन वंदना वनकर यांनी तर आभार राजू लांजेकर यांनी मानलेयावेळी पालकविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महत्वाची क्षणचित्रे : 1. नवीन प्रवेशित बालकांचे सजावट केलेल्या इनोव्हातून आगमन 2. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची विद्यार्थ्यांसोबत हितगुज 3. लेझीम आणि बॅन्डच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत 4. जिल्हाधिका-यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण 5. फित कापून तसेच दीप प्रज्वलनाने शैक्षणिक सत्राचा प्रारंभ 6. शिवगर्जनेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव. 7. नवीन बालकांच्या प्रवेशाच्या पाऊलखुणा 8. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. 9. जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅगपुस्तके आणि गणवेश वाटप.

शाळेविषयी माहिती : दाताळा येथील पी.एम.श्रीजिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 1 ली ते 8 वी पर्यंत एकूण 225 विद्यार्थी प्रवेशित आहेतनवीन शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहेशाळेमध्ये मुलामुलींकरीता स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालयपिण्याच्या पाण्यासाठी दोन आर.मशीन, 7 वर्गखोल्यांमध्ये स्मार्ट टिव्हीविज्ञान प्रयोगशाळास्टेम लॅबगार्डन आदी सोयीसुविधा आहेत.

०००००० 

No comments:

Post a Comment