Search This Blog

Thursday, 5 June 2025

वनमंत्र्यांच्या हस्ते वन नियंत्रण कक्ष व सायबर सेलचे उद्घाटन





 

वनमंत्र्यांच्या हस्ते वन नियंत्रण कक्ष व सायबर सेलचे उद्घाटन

Ø नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक 18003033

            चंद्रपूरदि. 5 जून : चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत वने आणि वन्यजीव संरक्षण व संवर्धन प्रभावीपणे होण्यासाठी तसेच मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेची माहिती मिळाल्याबरोबर लगेच घटनास्थळी पोहचण्यास लागणारा प्रतिसाद वेळ कमी करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर येथे सुसज्ज वन नियंत्रण कक्षाची निर्मिती करण्यात आली आहेया नियंत्रण कक्षाचे  तसेच सायबर सेलचे उद्घाटन राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

            यावेळी आमदार देवराव भोंगळेअपर मुख्य सचिव (वनेमिलिंद म्हैसकरप्रधान मुख्य वनसंरक्षक तथा वनबल प्रमुख शोमिता विश्वासप्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीवएमश्रीनिवास रावचंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉजितेंद्र रामगावकरजिल्हाधिकारी विनय गौडा जी.सीताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचालक प्रभुनाथ शुक्लाउपवनसंरक्षक कुशाग्र पाठकआनंद रेड्डीश्वेता बोड्डू आदी उपस्थित होते.

            वनमंत्री श्रीनाईक म्हणालेपोलिस नियंत्रण कक्षाच्या धर्तीवर वन विभागाने वन नियंत्रण कक्ष तयार केला आहेवनांशी संबंधित जिल्ह्यात घडणा-या घटनावाघांचे व बिबट्यांचे हल्लेआगी लागण्याचे प्रमाण आदी माहिती मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा ॲक्टीव्ह करण्याचे काम येथून केले जाईलचंद्रपूरचा हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर राज्यातील इतरही संवेदनशील भागात व प्रत्येक सर्कलमध्ये नियंत्रण कक्ष तयार करण्यात येईलअसे त्यांनी सांगितलेयावेळी वनमंत्र्यांच्या हस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त परिसरात वृक्षारोपन करण्यात आले.

वन नियंत्रण कक्षाची माहिती : सदर नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्रमांक (१८००३०३३हा आहेया कक्षातून चंद्रपूर वनवृत्तातील विभागाविषयी माहितीविभागातील कामकाजाविषयी माहिती मिळण्यास मदत होतेतसेच काही तक्रार असल्यास त्याचे निराकरण या कक्षाच्या माध्यमातून केले जाईलया कक्षाच्या माध्यमातून चंद्रपूर वनवृत्त व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प मधील सर्व वन कर्मचाऱ्यांचे तसेच शासकिय वाहनांचे रिअल टाईम लोकेशन मिळण्यास मदत होतेजेणेकरून कुठे घटना घडल्यास जवळपास असलेल्या कर्मचाऱ्यांचे लोकेशन बघून घटनास्थळी लवकर पोहचता येईल. 

वन नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून येथे 24 तास कमर्चारी उपस्थित आहेतसदर कक्षामार्फत वन कमर्चाऱ्यांकरीता फॉरेस्ट कंट्रोल नावाचे ॲन्ड्राईड ॲप तयार करण्यात आले आहेसदर एप्लीकेशन हाताळण्याबाबत वनरक्षक ते वनपरिक्षेत्र अधिकारी पर्यंतच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहेनियंत्रण कक्षाला एखाद्या घटनेची माहिती मिळाल्यास सदर घटनेची माहिती तात्काळ संबंधित वनरक्षकवनपालवनपरिक्षेत्र अधिकारी यांना ॲपच्या माध्यमातून लगेच प्राप्त होतेत्यानुसार मिळालेल्या माहितीच्या आधारे वनरक्षकास तात्काळ घटनास्थळी पोहचून कार्यवाही करण्यात मदत मिळते.

कार्यवाही पूर्ण झाल्यावर ॲपच्या टिकिटमध्ये घटनेविषयी संपूर्ण माहिती भरली जातेतसेच सदर माहिती कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित भरली किंवा नाही याची खात्री संबंधित वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी करून नंतर टिकिट बंद केल्या जातेवन नियंत्रण कक्षाद्यारे शासकीय वाहनांमध्ये सुद्धा कन्सोल स्क्रीन बसविण्याचे काम करण्यात आले आहेया स्क्रीनमध्ये फॉरेस्ट कंट्रोल ॲपचे लॉगिन करण्यात आले आहेयामुळे अधिकारी दौऱ्यावर असल्यास त्यांच्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या घटनांची माहिती शासकीय वाहनात मिळण्यास मदत होतेतसेच एखाद्या ठिकाणी मोठी घटना घडल्यास सदर घटनास्थळाच्या जवळपास असणाऱ्या वाहनास नियंत्रण कक्षाद्यारे माहिती देऊन लवकरात लवकर घटनास्थळावर पोहचता येईल.

००००००

No comments:

Post a Comment