Search This Blog

Sunday, 8 June 2025

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत शिबिरांचे आयोजन




 धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत शिबिरांचे आयोजन

Ø आदिवासी बांधवांनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 8 जून : जनजातीय गौरव वर्षानिमित्त भारत सरकारने 'प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान' (PM-JANMAN) आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' (DA-JGUA) अंतर्गत आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण आणि कालबध्द कार्यक्रम हाती घेतले आहेत. एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणून 'धरती आबा अभियान – एक केंद्रित जागरूकता आणि संपृक्तता मोहीमतसेच 'धरती आबा कर्मयोगी - एक क्षमता बांधणीकार्यक्रम या दोन हस्तक्षेपांद्वारे लक्षित बहु-क्षेत्रीय सेवा वितरणासाठी एक मोठी मोहीम आखलेली आहे. आदिवासी भागांमध्ये सेवा आणि पायाभूत सुविधांची परिपूर्णता सुनिश्चित करणे या उपक्रमांचा उद्देश आहे.

जनजातीय गौरव वर्ष (JJGV) 2025 चा भाग म्हणून शेवटच्या घटकापर्यंतच्या आदिवासी समुदायांना वैयक्तिक लाभांची घरपोच सेवा देण्यासाठी केंद्र सरकारच्या देशव्यापी मोहीमेअंतर्गत गाव- आणि क्लस्टरस्तरीय शिबिरांचे आयोजन केले आहे. यासाठी प्रत्यक्ष ग्रामस्तरावर आधारकार्डरेशनकार्डआयुष्मान भारतकार्ड (PM-JAY), जातीचे प्रमाणपत्रपीएम-किसानजनधनखाते काढणे अशा सेवा देण्यात येणार आहेत. ही शिबिरे स्थानिक प्रशासनफ्रंटलाइन कर्मचारी आणि विविध शासकीय विभागांच्या सेवांचे अभिसरण यांच्या सक्रिय सहभागातून चालतील. पात्र आदिवासी व्यक्ती आणि कुटुंबापर्यंत लाभ पोहोचविणे हा या शिबिरांचा उद्देश आहे.

या शिबिरांचे आयोजन  15 ते  30 जून 2025 या कालावधीत केले जात आहे. त्याअनुषंगाने राजूरा तालुक्यामध्ये 16 ते  25 जून पर्यत  मंगी बु.सिर्सीयेरगव्हाणभुरकुंडा खु. जामणी येथे. कोरपणा तालुक्यामध्ये 16  ते 26 जून पर्यत रुपापेठधानोलीखेरगावसावलहीराधामनगाव येथे. जिवती तालुक्यामध्ये  17 ते 27 जूनपर्यत नगराळाजिवतीभारीपाटणयेल्लापुरकुंभेझरीनोकेवाडा. मुल  तालुक्यामध्ये 17 ते 27 जूनपर्यत मुरमाळीचिखलीआकापुरजानाळाभवराळा. पोंभुर्णा तालुक्यामध्ये 16 ते  24 जूनपर्यत थेरगावदेवईभटाळीकेमाराचिंतलधाबा क्र.1 व 2. सावली तालुक्यामध्ये 17 ते 20 जूनपर्यत  बोरमाळाचारगाव. सिंदेवाही तालुक्यामध्ये 17 ते 27 जूनपर्यत कारव्हानाचनभटीसिरकाडामोहाळीकळमगाव गन्नासरडपार. चंद्रपुर तालुक्यामध्ये 19 जूनला लोहारा येथे. बल्लारपुर तालुक्यामध्ये 23 जूनला कवडजईगोंडपिपरी तालुक्यामध्ये 24 जूनला धानापुर येथे कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांतून मोठया प्रमाणात आदिवासी नागरीकांना विविध सेवांचा लाभ मिळणार आहे.

जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे आवाहन :

15 ते 30 जून 2025 दरम्यान होणा-या शिबिरांना आदिवासी बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित राहुन आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे काढून घ्यावीतअसे आवाहन  जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment