12 जून रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन
चंद्रपूर, दि. 09 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मॉडल करिअर सेंटर, यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने 12 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र येथे प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय., पदविका, पदवी इत्यादी युवक व युवतींकरीता विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. सदर प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये 32 पेक्षा जास्त पदे भरण्यात येणार असून वी. आर इंटरप्रायजेस, चंद्रपूर यांच्याकडे तांत्रिक पदे तसेच जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत 10 उमेदवार भरावयाचे असल्याचे कार्यालयास कळविण्यात आले आहे.
तरी मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या 2 प्रतीसह उपस्थित राहावे. तरी अधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दुरध्वनी क्रमांक 0717- 252295 येथे संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भाग घेण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment