शेळी पालन, कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण
चंद्रपूर, दि. 09 : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक/युवतींकरीता 9 ते 13 जून 2026 या कालावधीमध्ये पाच दिवसीय शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेळी पालन, दुग्ध व्यवसाय व कुक्कुट पालन यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबडयांच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण, प्रतिबंधात्मक उपाय, त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ज्ञ व शासकीय अधिका-यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छूक युवक/युवतींनी www.mced.co.in या वेबसाईट वर अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी संदीप जाने, मिलींद कुंभारे. स्मिता पेरके यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
००००००

No comments:
Post a Comment