आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू
चंद्रपूर, दि. 09 : कौशल्य विकास व उद्योजकता नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 या सत्रासाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे काम सुरू झाले आहे.
ऋषी अगस्त्य शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांना 21 मे पासून नि:शुल्क मार्गदर्शन सत्र सुरू करण्यात आले आहे. तसेच अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 21 जून आहे. उमेदवारांना ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे, पडताळणी, स्विकृती आणि निश्चिती या केंद्रावर करू शकतील. उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तिकेत देण्यात आलेली माहिती व प्रवेश पध्दती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा. ऑनलाईन प्रवेशाकरिता http://admission.dvet.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच संस्थेत प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.
ऋषी अगस्त्य शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे डिझेल मेकॅनिक, ट्रक्टर मेकॅनिक, कारपेंटर, स्टेनो, कोपा, पंप ऑपरेटर कम मेकॅनिक, मेकॅनिक अॅटो इलेक्ट्रीकल अॅन्ड इलेक्ट्रानिक्स, मेसन स्युईंग टेक्नॉलॉजी, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, फिटर, मोटर मॅकेनिक, टर्नर, मशीनिस्ट, इलेक्ट्रानिक्स मेकॅनिक, आर.ए.सी., वायरमन, आयसीटीएस, इत्यादी व्यवसायात प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत.
पात्रताधारक उमेदवारांनी आपले शैक्षणिक कागदपत्रे (10 वी ची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलियर) व इतर शालेय प्रमाणपत्रासह प्रवेश अर्ज भरण्याकरिता व अधिक माहितीसाठी संस्थेमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत संपर्क करावा, असे आवाहन प्राचार्य जी. यु. राजुरकर यांनी केले आहे.
०००००

No comments:
Post a Comment