हिंदु खाटीक जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य
चंद्रपूर, दि. 23 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाची उपकंपनी हिंदु खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळमार्फत हिंदु खाटीक जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष 2026-27 करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत 2 लाभार्थ्यांचे, बिजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत 2 लाभार्थ्यांचे, थेट कर्ज योजनेअंतर्गत 6 लाभार्थ्यांचे, एनएसएफडीसी मुदती कर्ज योजनेअंतर्गत 3 लाभार्थ्यांचे, एनएसएफडीसी सुक्ष्मपत पुरवठा योजनेअंतर्गत 3 लाभार्थ्यांचे व एनएसएफडीसी शैक्षणीक योजनेअंतर्गत 1 लाभार्थ्यांचे असे एकूण 15 लाभार्थ्यांला कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.
1) अनुदान योजना : प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत, सदर योजनेत 25 हजार पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व 25 हजार पर्यंत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बैंकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे 3 वर्षात करावयाची आहे.
2) बिजभांडवल योजना : प्रकल्प मर्यादा 50 हजार रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 20 टक्के बिजभांडवल कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. 75 टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 ते 5 वर्षात करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.
3) घेट कर्ज योजना : प्रकल्प मर्यादा 1 लक्ष रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या 45 हजार रुपये कर्ज महामंडळामार्फत 4 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 50 हजार महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावी लागते व 5टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.
4) एनएसएफडीसी मुदती कर्ज योजना : प्रकल्प मर्यादा 1 लक्ष 40 हजार ते 50 लक्ष रुपयांपर्यंत, प्रकल्प मुल्याच्या 90 टक्के पर्यंत कर्ज महामंडळामार्फत 8 टक्के पर्यंत द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 50 हजार रुपये महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 7 वर्ष पर्यंत करावी लागते व 5 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.
5) एनएसएफडीसी सुक्ष्मपत पुरवठा : प्रकल्प मर्यादा 1 लक्ष 40 हजार रुपये, प्रकल्प मर्यादेच्या 9 लक्ष पर्यंत कर्ज, महामंडळामार्फत 6.50 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये 50 हजार महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 3 वर्षात करावी लागते.
6) एनएसएफडीसी शैक्षणिक कर्ज योजना : कर्ज मर्यादा 40 लक्ष, प्रकल्प मर्यादेच्या 90 टक्क्यांपर्यंत कर्ज, महामंडळामार्फत 6.50 टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार 12 वर्षात करावी लागते. 10 टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.
वरील दिलेले योजनांचे अर्ज भरण्याकरीता व माहिती करीता हिंदु खाटीक समाज आर्थीक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपर येथे संपर्क करावा. अधिक माहितीकरीता दूरध्वनी क्र. 07172 -25354.
००००००
No comments:
Post a Comment