Search This Blog

Thursday, 18 June 2026

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 19 जून रोजी लाभ वितरण कार्यक्रम

 

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 19 जून रोजी लाभ वितरण कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 18 : प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीच्या निमित्ताने भारत सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयामार्फत 19 जून 2026 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पंतप्रधानांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान लाभार्थ्यांना थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने सुमारे 2,400 कोटी रुपयांची प्रोत्साहन रक्कम वितरित करणार आहेत.

चंद्रपूर येथेही कार्यक्रमाचे आयोजन : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, चंद्रपूर येथेही 19 जून रोजी दुपारी 4.30 आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास सुमारे 300 नियोक्ते व कर्मचारी उपस्थित राहणार असून योजनेअंतर्गत लाभ प्राप्त करणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत 1019 आस्थापनांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली असून 8406 नवीन कर्मचारी संघटित रोजगार क्षेत्रात सहभागी झाले आहेत. यामध्ये 6735 पुरुष व 1671 महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

००००००

No comments:

Post a Comment