Search This Blog

Wednesday, 17 June 2026

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश


अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेश

चंद्रपूर, दि. 16 :  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अंतर्गत कार्यरत असलेल्या शासकीय वसतीगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. प्रकल्पांतर्गत मुलांचे 12 (चंद्रपूर येथे 2, राजुरा येथे 2 , गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल. सावली, पोंभूर्णा व गोंडपिपरी) व मुलींचे 11 (चंद्रपूर येथे 2, राजुरा, गडचांदूर, कोरपना, जिवती, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभूर्णा व गोंडपिपरी) असे एकूण 23 शासकीय वसतिगृह कार्यरत आहेत.

सन 2026-27 करीता रिक्त जागांवर प्रवेशासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. नवीन प्रि-मॅट्रिक विद्यार्थ्यांनी तसेच 11 वी कनिष्ठ महाविद्यालयात तथा इयत्ता 12 वीत प्रवेशित जुन्या विद्यार्थ्यांनी www.swayam.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरावे.

           अर्ज भरतांना सदर प्रणालीमध्ये दिलेल्या सूचनांचे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक वाचन करावे व त्यात दिलेल्या कागदपत्रांची जोडणी करण्यात यावी. वसतिगृहातील ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही, असे विद्यार्थ्यांनी आपला अर्ज फक्त रिनीव्हल करायचा आहे. नविन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्या अर्जाची प्रिंट काढून योग्य त्या कागदपत्रांसह अर्ज भरलेल्या दिनांकापासून आपण निवडलेल्या वसतिगृहात एक आठवड्याच्या आत सादर करावे.              

अनुसूचित जमातीच्या पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment