Search This Blog

Tuesday, 23 June 2026

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

 

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज आमंत्रित

चंद्रपूर,दि.23 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार दिला जातो. ज्या मुलांनी (वय 5 वर्षांपेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या), शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांना हा  पुरस्कार देण्यात येतो.

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2026 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. सदरचे अर्ज http://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 पेक्षा अधिक व 31 जुलै, 2026 रोजी 18 वर्षांपेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कतिक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्रशासिन प्रदेश, जिल्हाधिकारी / जिल्हा दंडाधिकारी, पंचायत राज्य संस्था, शैक्षणिक संस्था इ. अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली असून सदर संकेतस्थळावर पात्र उमेदवारांनी जावून अर्ज करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपूर कार्यालयाशी संपर्क साधावा.

००००००

No comments:

Post a Comment