Search This Blog

Monday, 22 June 2026

शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरतीसाठी मुलाखत


शासकीय निवासी शाळांमध्ये तासिका तत्त्वावर शिक्षक भरतीसाठी मुलाखत

चंद्रपूर, दि. 22 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा, चिमूर, ता. चिमूर, येथे शैक्षणिक सत्र 2026-27 साठी घड्याळी तासिका तत्त्वावर उच्च प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी आवश्यक मूळ कागदपत्रे तसेच साक्षांकित छायाप्रतींसह 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), ता. बल्लारपूर, येथे उपस्थित राहावे.

रिक्त पदांचा तपशील : 1. शासकीय निवासी शाळा, भिवकुंड (विसापूर), येथे मराठी (इयत्ता 6 वी ते 8 वी) करीता 1 पद, शैक्षणिक पात्रता बी.ए., डी.एड., इंग्रजी विषयाकरीता (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद – बी.ए., डी.एड., मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी)  1 पद – एम.ए., बी.एड.

2. शासकीय निवासी शाळा, चिमूर येथे विषय इंग्रजी (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.ए., डी.एड.,विषय-विज्ञान (इयत्ता 6 वी ते 8 वी) 1 पद, बी.एस्सी., डी.एड., विषय-मराठी (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड., विषय-सामाजिक शास्त्र (इयत्ता 9 वी ते 10 वी) 1 पद, एम.ए., बी.एड.

अटी व शर्ती : 1. उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारे करण्यात येईल, 2. निवड झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार व आर्थिक तरतूद उपलब्ध झाल्यानंतर मानधन/वेतन अदा करण्यात येईल. 3.आवश्यकतेनुसार पदांची संख्या कमी अथवा जास्त करण्याचा, भरती प्रक्रिया रद्द करण्याचा किंवा पदे संपुष्टात आणण्याचा अधिकार सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर यांना राहील. 4.मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना कोणताही प्रवास भत्ता देय राहणार नाही.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित शाळेशी अथवा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

No comments:

Post a Comment