Search This Blog

Friday, 12 June 2026

पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने आमंत्रित

 पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन नामांकने आमंत्रित

चंद्रपूर, दि.१२ :  पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक आहेत. गृह मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडुन प्रजासत्ताक दिनाच्या (२०२७) निमित्ताने जाहीर केल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी राज्यातून नामांकने मागविण्यात येत आहे.

या पुरस्कारांचा उद्देश विशेष कामगिरीची दखल घेणे हा असून, कला, साहित्य व शिक्षण, क्रीडा, वैद्यकीय क्षेत्र, समाजकार्य विज्ञान व अभियांत्रिकी, नागरी सेवा, व्यापार व उद्योग इत्यादी सर्व क्षेत्रांमधील/विषयांमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी अथवा सेवेसाठी पद्म पुरस्कार पद्मविभुषण, पद्मभुषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले जातात. त्याअनुषंगाने ज्या व्यक्तिंनी महिला सक्षमीकरण व बाल विकास क्षेत्रात यशस्वी कामगिरी व योगदान दिले आहेत, त्या पात्र व्यक्तिंनी http://awards.gov.in या संकेतस्थळावर १५ जून २०२६ पर्यंत सदर संकेतस्थळावर रितसर माहिती भरून पुरस्काराकरीता आवेदन करावे.

अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, चंद्रपुर, आकाशवाणीच्या मागे, साईबाबा वार्ड, चंद्रपुर या कार्यलयात संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment