Search This Blog

Tuesday, 16 June 2026

सेवानिवृत्तीवेतन प्रकरणासंबंधी 18 जून रोजी पेन्शन अदालत


सेवानिवृत्तीवेतन प्रकरणासंबंधी 18 जून रोजी पेन्शन अदालत

चंद्रपूर, दि. 16 : सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या अडचणीचे निराकरण करणे तसेच सेवानिवृत्ती वेतन प्रकरणावर करावयाची कार्यवाही याबाबत 18 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे पेन्शन अदालत/कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे. तरी सर्व आहरण व संवितरण अधिकारी आणि राज्य शासनाचे निवृत्तीवेतनधारक यांनी सदर पेन्शन अदालत/कार्यशाळेस उपस्थित राहावे, असे  जिल्हा कोषागार अधिकारी तृप्ती टेमकर यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment