Search This Blog

Tuesday, 16 June 2026

परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीधारकांचे उजळणी प्रशिक्षण


परिवहन संवर्गातील अनुज्ञप्तीधारकांचे उजळणी प्रशिक्षण

चंद्रपूर, दि. १६ : रस्ता अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जीवितहानी व वित्तहानी होत आहे. बहुतेक अपघातामध्ये प्रामुख्याने प्रवासी बस, स्कूल बस ट्रक, ट्रेलर, टेम्पो, टॅक्सी, ऑटोरिक्षा इत्यादी वाहन चालकाचा समावेश मोठया प्रमाणात दिसून येतो. सदर वाहन चालकांना उजळणी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यलय, चंद्रपूर येथे 1 जुलै 2026 पासून उजळणी  प्रशिक्षण राबविण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षण हे आठवड्यातील दर बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयातील रस्ता सुरक्षा कक्षामध्ये आयोजित  करण्यात येईल. अनुज्ञप्ती नुतनीकरण करतांना वाहनधारकांना सदर उजळणी प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. तसेच ज्या दोषी वाहनधारकाविरुध्द उदा.  विना हल्मेट, मोबाईलवर बोलने, मालवाहू वाहनातून प्रवास वाहतूक, जादा भार वाहतूक, रेड सिग्नल जंपीग, बेदरकारपणे वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे इत्यादी वाहनधारकांना सदरचे प्रशिक्षण हे बंधनकारक करण्यात येत आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment