Search This Blog

Wednesday, 17 June 2026

अनुसूचित जातीतील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

 अनुसूचित जातीतील नागरिकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य

Ø महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला ११५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट

चंद्रपूर, दि. १७ : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळमार्फत अनुसूचित जातीतील लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय उपलब्ध करून दिले जाते. चालु आर्थिक वर्ष २०२६-२७ करीता महामंडळाच्या मुख्यालयाकडून अनुदान कर्ज योजनेअंतर्गत ३५ लाभार्थी, बिजभांडवल कर्ज योजनेअंतर्गत ३५ तर थेट कर्ज योजनेअंतर्गत ४५ असे एकूण ११५ लाभार्थ्यांना कर्ज व अनुदान वाटप करण्याचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे.

१) अनुदान योजना : प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत, सदर योजनेत २५ हजार पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व उर्वरीत २५ हजार रुपयांपर्यंत अनुदान महामंडळामार्फत देण्यात येते. बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे ३ वर्षात करावयाची आहे.

२) बिजभांडवल योजना : प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बिजभांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचा समावेश आहे. ७५ टक्के पर्यंत कर्ज बँकेमार्फत दिले जाते व सदर कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येतो. महामंडळाचे व बँकेच्या कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ ते ५ वर्षात करावी लागते व ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

३) थेट कर्ज योजना : प्रकल्प मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत, प्रकल्प मर्यादेच्या ४५ हजार रुपयांपर्यंत कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा. द.शे. व्याजदराने देण्यात येते. सदर राशीमध्ये ५० हजार रुपये महामंडळाचे अनुदानाचा समावेश आहे. महामंडळाचे कर्जाची परतफेड एकाच वेळेस ठरवून दिलेल्या समान मासिक हप्त्यानुसार ३ वर्षात करावी लागते व ५ टक्के लाभार्थ्यांचा सहभाग असतो.

वरील दिलेले योजनांचे अर्ज भरण्याकरीता महामंडळाच्या mahadisha.mpbcdc.in या पोर्टलवर जाऊन अर्ज भरावे. अधिक माहितीकरीता महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चंद्रपर येथे तसेच दूरध्वनी क्र. ०७१७२-२५३५४९ वर संपर्क करावा, जिल्हा व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment