Search This Blog

Friday, 31 October 2025

राष्ट्रीय एकतेसाठी ‘वॉक फॉर युनिटी’




 राष्ट्रीय एकतेसाठी वॉक फॉर युनिटी

Ø पोलिस प्रशासनअधिकारीखेळाडू आणि नागरिकांचा सहभाग

चंद्रपूरदि. 31 : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वॉक फॉर युनिटी’ या पायदळ रॅलीमध्ये चंद्रपूर पोलिस दलासह विविध विभागाचे अधिकारीसामाजिक संघटनांचे प्रतिनिधीविद्यार्थीखेळाडू आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविलाशौर्यसेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही  रॅली श्रीछत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक मार्गे पोलिस मुख्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती.

यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडेउपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात सदर रैलीत विविध पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंडक्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाडचंद्रपूर शहरातील वरिष्ठ नागरिकविविध क्षेत्रातील व्यवसायिकविविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थीविशेषतः एनएसएस व एससीसी कॅटेड आणि विविध समाजसेवी संघटनायोगनृत्य क्लब आदी मोठया प्रमाणात उपस्थित होते.

पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणालेचंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातोलोहपुरुष सरदार वल्लभभाई यांनी देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेतोच वारसा पुढे नेऊन आजच्या विद्यार्थी आणि नागरिकांनी आपला देश एकसंघ ठेवण्याचा संकल्प करावा.

यावेळी उपस्थित शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना एकतेचासामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात आलातसेच सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलिस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्यायाठी मार्गदर्शन करण्यात आले.

सोबतच सायबर गुन्हे व उपाययोजनामुली व महिलांची सुरक्षितताअंमली पदार्थाचे दुष्परिणामवाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आलीशेवटी राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले आहेतत्पुर्वी पोलिस मुख्यालय चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचेसुध्दा आयोजन करण्यात आले होते.

००००००

विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत 256 खेळाडूंचा सहभाग


विभागीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत 256 खेळाडूंचा सहभाग

Ø चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकूल येथील वातानुकूलीत हॉलमध्ये आयोजन

चंद्रपूरदि. 31 : नागपूर विभागीय शालेय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धांचे आयोजन 30  31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातानुकूलित बॅडमिंटन हॉल येथे करण्यात आलेयात नागपूर विभागातील नागपूर ग्रामीणनागपूर महानगरपालिका क्षेत्रचंद्रपूर ग्रामीणचंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रगडचिरोलीभंडारागोंदियावर्धा जिल्ह्यातून 128 मुले व 128 मुली असे एकूण 256 खेळाडू मुला-मुलींनी सहभाग नोंदविला.

युवक सेवा संचालनालयपूणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयजिल्हा क्रीडा परिषदचंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पूंडजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्या हस्ते करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी यांनीचंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या वातानुकूलीत बॅडमिंटन हॉलमध्ये राज्यराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू निर्माण होत असून त्याचा लाभ जिल्ह्यातील  खेळाडू मोठ्या प्रमाणावर घेत आहेअसे सांगितले.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी तथा स्पर्धा प्रमुख मनोज पंधराम यांनी केलेस्पर्धा यशस्वी करण्याकरीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अधिकारी/कर्मचारी व जिल्हा क्रीडा संकुल समिती चंद्रपूरच्या कर्मचा-यांनी विशेष प्रयत्न केलेयावेळी मोठया प्रमाणात खेळाडू व नागरिक उपस्थित होते.

००००००

निर्लेखित शासकीय वाहनाच्या विक्रीकरीता 10 नोव्हेंबर पर्यंत निविदा आमंत्रित

 


निर्लेखित शासकीय वाहनाच्या विक्रीकरीता 10 नोव्हेंबर पर्यंत निविदा आमंत्रित

चंद्रपूरदि. 31 :  निर्लेखित  शासकीय वाहनाची विक्री ज्या स्थितीत व जेथे आहे त्या स्थितीत करण्यासाठी इच्छुक खरेदीदारांकडून 10 नोव्हेंबर 2025 च्या दुपारी 2 वाजेपर्यंत मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहे.

विक्री करण्यात येणारे वाहन क्रमांक MH३४-९९००इन्होवा डीव्ही वाहनाची उपप्रादेशिक परिहवन अधिकारी यांनी ठरवून दिलेली बाजारमुल्य किंमत लक्ष 50 हजार रुपये असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात सदर वाहन उभे आहेनिविदा अर्जाची किंमत एक हजार रुपये असून सदर अर्ज सहायक जिल्हा नाझरजिल्हा कार्यालयचंद्रपूर यांच्याकडे कार्यालयीन वेळेत 10 नोव्हेंबरच्या दुपारी 2  वाजेपर्यंत प्राप्त करता येईललिलावातील अटी व शर्ती बाबत उल्लेख निविदा फॉर्ममध्ये राहीलत्याचे अधिन राहून निविदा स्विकारल्या  जातीलप्राप्त  निविदा 10 नोव्हेंबर रोजी दुपारी 4  वाजता उपस्थितांसमोर उघडण्यात येतील.

              वरील शासकीय वाहनांच्या बाबतीत पुरेशा निविदा प्राप्त न झाल्यास शासकीय वाहनाच्या  विक्रीबाबत खुली बोली बोलून लिलाव त्याच दिवशी करण्यात येईलअसे निवासी उपजिल्हाधिकारी डी.एसकुंभार यांनी कळविले आहे.

००००००

1 नोव्हेंबर रोजी महसूल मंत्री बावनकुळे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

नोव्हेंबर रोजी महसूल मंत्री बावनकुळे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूर दि. 31 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे नोव्हेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

नोव्हेंबर रोजी सकाळी 10.40 वाजता ब्रह्मपुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ प्रशासकीय पटांगणात महसूल विभाग पट्टे वाटप कार्यक्रमास उपस्थितीदुपारी 12 वाजता ब्रह्मपुरी येथून गडचिरोली कडे प्रयाणदुपारी 12.15 वाजता गडचिरोली वरून सावलीकडे प्रयाणदुपारी 12.50 वाजता सावली पोलिस स्टेशन जवळ  पक्षाच्या मेळाव्यास उपस्थितीदुपारी वाजता सावली येथून गडचिरोली कडे प्रयाण.

००००००

सीसीआयचे ‘कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू

 

सीसीआयचे कापूस किसान मोबाईल ॲप’ सुरू

               चंद्रपूरदि. 31 :  भारतीय कापूस महामंडळ (सीसीआयने ‘कापूस  किसान मोबाईल ॲप’ नावाचे एक मोबाईल ॲप्लीकेशन  सुरू केले आहेसदर ॲप कापूस हंगामात 24 तास व दिवस उपलब्ध असेल.

          कापूस किसान मोबाईल ॲपद्वारे नोंदणी व स्लॉट बुकींग प्रक्रियेस मदत करण्यासाठी एक विशेष लिंक तयार करण्यात आली आहेअॅपमध्ये नोंदणी व स्लॉट बुकींगसाठी सविस्तर माहिती व पायऱ्या  दिलेल्या आहेत.    शेतक-यांनी https://www.youtube.com/@KapasKisan-Official या लिंकवर क्लिक करून स्थानिक भाषेत तयार केलेली माहिती व व्हिडीओ पहावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

अशी आहे स्लॉट बुकींग प्रक्रिया : स्लॅाट बुकिंग सुविधा दिवसाच्या रोलिंग बेसिसवर खुली राहीलप्रत्येक दिवशी एक तारीख बंद होईल,  दुसऱ्या  दिवशी नवीन तारीख खुली केली जाईलउद्धघाटनाच्या दिवशी सुट्टी नसेलमहाराष्ट्र राज्याकरीता स्लॉट बुकींगची  वेळ पूढीलप्रमाणे असेल,

           अकोला व औरंगाबाद  शाखा स्लॉट सुरु होण्याची वेळ दररोज सकाळी 10 वाजतासर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी शक्य तितक्या लवकर नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.  तसेच सीसीआयच्या खरेदी केंद्रावर कापूस विक्रीस येण्यापूर्वी स्लॉट बुकींग करणे आवश्यक आहेअधिक माहितीकरीता 07239-228114 या दूरध्वनीवर संपर्क करावाअसे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ वणीचे प्रभारी विभागीय व्यवस्थापक डी.बीदोईजोड यांनी कळविले आहे.

००००००

Thursday, 30 October 2025

जनतेच्या सेवेसाठी असलेल्या रस्त्याचे काम प्रामाणिकपणे करा




जनतेच्या सेवेसाठी असलेल्या रस्त्याचे काम प्रामाणिकपणे करा

Ø पालकमंत्र्यांच्या हस्ते शेगाव (खु.), चंदनखेडामुधोली रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन

चंद्रपूरदि. 30 : भद्रावती तालुक्यातील शेगाव (खु.), चंदनखेडा – मुधोली – मोहर्ली हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने गावक-यांसाठी तर महत्वाचा आहेचमात्र ताडोबात येणा-या देशविदेशातील पर्यटकांसाठी सुध्दा अतिशय सोयीचा आहेराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात या रस्त्याच्या रुंदीकरणाला आणि सुशोभिकरणाला मंजुरी दिलीत्यामुळे जनतेच्या सोयीसाठी असलेल्या या रस्त्याचे काम प्रामाणिकपणे करून रस्त्याची गुणवत्ता व दर्जा उत्कृष्ट राखाअशा सुचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी दिल्या.

बुधवारी शेगाव (खु.) येथे रस्त्याच्या रुंदीकरण कामाचे भुमिपुजन करताना ते बोलत होतेयावेळी खासदार प्रतिभा धानोरकरआमदार करण देवतळेप्रभारी जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेअतिरिक्त पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडेउपविभागीय अधिकारी संदीप भस्केतहसीलदार योगेश कौटकर (वरोरा), बालाजी कदम (भद्रावती), कार्यकारी अभियंता अक्षय पगारेसहाकार्यकारी अभियंता जय तिवारीसरपंच मोहित लभाणे आदी उपस्थित होते.

अर्थसंकल्पात नागपूर विभागात केवळ या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळालीअसे सांगून पालकमंत्री डॉवुईके म्हणालेयासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालेशेगाव – चंदनखेडामुधोली – मोहर्ली या रस्त्याचा प्रश्न 2025 पासून प्रलंबित होतातसेच याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्याराज्य शासनाने या रस्त्याच्या कामाला मंजुरी दिली आहेगावक-यांसाठी अतिशय उपयोगी असलेल्या या रस्त्याचे बांधकाम अतिशय गुणवत्तापुर्वक व दर्जेदार व्हायला पाहिजेरस्त्याबाबत कोणतीही तक्रार येऊ देवू नकासार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या कामावर नियमितपणे लक्ष ठेवावेअशाही सूचना पालकमंत्री डॉवुईके यांनी दिल्या.

तत्पुर्वी पालकमंत्र्याच्या हस्ते कुदळ मारून रस्त्याच्या बांधकामाचे भुमिपूजन करण्यात आलेप्रास्ताविकात कार्यकारी अभियंता अक्षय पगारे म्हणालेया रस्त्यासाठी अर्थसंकल्पात 85 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. 33 किमी लांबीच्या या रस्त्यामुळे गावखेड्यातील नागरिक आणि ताडोबाला येणा-या पर्यटकांना फायदा होईल.

दळणवळणासाठी अतिशय महत्वाचा रस्ता : खासदार प्रतिभा धानोरकर

राज्य शासनाने बजेटमधून भद्रावती तालुक्यात हे काम मंजूर केले आहेअनेक गावे आणि ग्रामपंचायती या रस्त्यावर असून दळणवळणासाठी हा रस्ता अतिशय महत्वाचा आहेअसे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सांगितलेशेगावचंदनखेडामोहर्लीजुनोनाकोलारा गेटकरीता हा रस्ता सोयीस्कर आहेत्यामुळे कंत्राटदारांनी अतिशय चांगले काम करावेअसेही त्या म्हणाल्या.

पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्याला यश : आमदार करण देवतळे

या अर्थसंकल्पात संपूर्ण राज्यात 15 रस्त्यांच्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिलीयात नागपूर विभागातून केवळ भद्रावती तालुक्यातील शेगावचंदनखेडामुधोली या रस्त्याचा समावेश करण्यात आलायासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी सातत्याने पाठपुरावा केलाया रस्त्याने अनेक पर्यटक ताडोबाला येत असतातत्यामुळे रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभीकरण आवश्यकच होतेअधिका-यांनी रस्त्याच्या कामाची गती ठेवून दर्जेदार काम करावेअसे आमदा करण देवतळे यांनी सांगितले.

०००००००

31 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर पोलिस दलाचे ‘वॉक फॉर युनिटी’

 

31 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर पोलिस दलाचे वॉक फॉर युनिटी

चंद्रपूरदि. 30 : भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने 31 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 6.30 वाजता वॉक फॉर युनिटी’ या विशेष पायदळ रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय एकतासामाजिक सौहार्द आणि देशप्रेमाचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणेसरदार वल्लभभाई पटेलांच्या विचारांप्रमाणे अखंड भारताची भावना जनमानसात रुजवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आाहेशौर्यसेवा आणि एकतेचा संदेश देणा-या रॅलीची सुरुवात श्रीछत्रपती शिवाजी महाराज चौकपटेल हायस्कुल समोरून होणार असून समारोप पोलीस मुख्यालय येथे समाप्त होईलपोलिस अधिकारी/अंमलदारएनसीसी कॅडेटएनएसएस विद्यार्थीइतर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीविविध समाजसेवी संघटना तसेच नागरिकांनी यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तात्काळ अर्ज नोंदणी करा


डॉबाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी तात्काळ अर्ज नोंदणी करा

चंद्रपूरदि. 30 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील 11 वी, 12 वी व त्यानंतरचे व्यावसायिक तसेच बिगर  व्यावसायिक  अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेलेसामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केलेले व वसतीगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉबाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना https//hmas mahait.org या पोर्टल वर ऑनलाईन सुरू करण्यात आली आहे.

स्वाधार योजनेचे सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून जिल्ह्यातील स्वाधार योजनेकरिता पात्र विद्यार्थ्यांनी https//hmas-mahait.org या पोर्टलवर लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज सादर करावेतसेच सदर अर्जाची प्रत संपूर्ण कागदपत्रासह कार्यालयामध्ये सादर करावीअधिक माहितीसाठी सहायक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपूर या कार्यालयास भेट द्यावीअसे आवाहन सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

Wednesday, 29 October 2025

अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात 67 कोटी 43 लक्ष रुपयांचे वाटप




अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात 67 कोटी 43 लक्ष रुपयांचे वाटप

Ø वरोरा येथील पत्रकार परिषदेत पालकमंत्र्यांची माहिती

Ø मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही

Ø उर्वरीत वाटप तात्काळ करण्याचे प्रशासनाला निर्देश

चंद्रपूरदि. 29 : यंदाच्या पावसाळ्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतमालांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेराज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर केले आहेत्यानुसार आतापर्यंत जिल्ह्यातील 94098 शेतकऱ्यांना 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपयांचे वाटप झाल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांनी वरोरा येथील विश्रामगृहात पत्रकार परिषदेत दिलीतसेच ज्या शेतक-यांच्या खात्यात तांत्रिक कारणांमुळे निधी पोहचला नाहीअशा शेतक-यांची अडचण दूर करून त्यांच्या खात्यात तात्काळ निधी जमा करावाअसे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.

चंद्रपूर जिल्ह्यात जूनजुलैऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लक्ष 10 हजार 665 हेक्टर जमीन बाधित झालीजिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांची संख्या लक्ष 26 हजार 286 आहेयासाठी राज्य शासनाकडून 94 कोटी 86 लक्ष 27 हजार रुपये प्राप्त झालेजिल्हा प्रशासनाने आतापर्यंत 94 हजार 98 शेतकऱ्यांच्या खात्यात 67 कोटी 43 लक्ष 28 हजार रुपये जमा केले आहे.

यात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 12 हजार 882 शेतकऱ्यांच्या खात्यात कोटी 84 लक्ष 75 हजार रुपयेऑगस्ट महिन्यातील बाधित 12 हजार 297 शेतकऱ्यांना कोटी 42 लक्ष 46 हजार रुपये आणि सप्टेंबर महिन्यातील बाधित 68 हजार 919 शेतकऱ्यांच्या खात्यात 51 कोटी 16 लक्ष हजार रुपये वाटप करण्यात आल्याचे पालकमंत्री डॉअशोक वुईके यांनी सांगितले

 पत्रकार परिषदेला आमदार करण देवतळेप्रभारी जिल्हाधिकारी डॉनितीन व्यवहारेसहायक जिल्हाधिकारी बालाजी कदमउपविभागीय अधिकारी संदीप भस्केतहसीलदार योगेश कौटकर आदी उपस्थित होते.

रब्बी हंगामासाठी अतिरिक्त अनुदानाची मागणी : अतिवृष्टी आणि पुरामुळे विविध शेती पिकांचे झालेल्या नुकसानीच्या अनुषंगाने रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगिक बाबीकरिता प्रती हेक्टरी 10 हजार रुपये याप्रमाणे शासनाकडे निधी मागणी करण्यात आली आहेयात जून -जुलै महिन्यातील अतिवृष्टीबाधित 13 हजार 742 शेतकऱ्यांसाठी कोटी 62 लक्ष 10 हजार रुपयेऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीबाधित 15 हजार 384 शेतकऱ्यांसाठी 14 कोटी लक्ष 67 हजार रुपये तर सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीबाधित 96 हजार 477 शेतकऱ्यांसाठी 87 कोटी 64 लक्ष 14 हजार रुपयांची अतिरिक्त मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे.

जिल्ह्यात दुष्काळी सवलती जाहीर : अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतमालाचे नुकसान झाल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात राज्य शासनाने दुष्काळी सवलती जाहीर केल्या आहेतयात जमीन महसुलात सूटसहकारी कर्जाचे पुनर्गठणशेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीत एक वर्षाकरीता वसुलीस स्थगितीतिमाही वीजबिलात माफी आणि 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कामध्ये माफी यांचा समावेश आहे

शासनाकडून प्राप्त झालेला अतिवृष्टीग्रस्त मदतनिधी त्वरित वाटप करण्याचे काम अविरत सुरू आहेमात्र काही तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यात आली नाहीयात प्रामुख्याने सामुहिक खाते असलेल्या खातेदारांचे संमती पत्र न मिळणेई -केवायसी प्रलंबित असणेआधार अपडेट व बँक खाते संलग्न नसणे याचा समावेश आहेतरी सामुहिक खातेदारांनी संबंधित तलाठ्याकडे त्वरित संमतीपत्र सादर करावेमदतनिधी न मिळालेल्या शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयसेतू केंद्र तसेच तलाठ्यांशी संपर्क करून ई -केवायसी करून घ्यावीतसेच आपले आधार कार्ड बँक खात्याला संलग्न करावेजेणेकरून शेतक-यांच्या खात्यात मदत निधी जमा करता येईल.

०००००००

4 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

 4 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्यात ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

Ø महिलांनी पुढाकार घेऊन तक्रारी मांडण्याचे रुपाली चाकणकर यांचे आवाहन

चंद्रपूरदि. 29 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारीया उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हयात मंगळवार नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेतनियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपुर येथे सकाळी 11 वाजता होणा-या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यातअसे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून 'महिला आयोग आपल्या दारीहा उपक्रम राबविण्यात येत आहेयासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 4 नोव्हेंबर, 2025 रोजी चंद्रपुर जिल्हयात येणार आहेतयावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहेजनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासनपोलिसकामगारपरिवहनआरोग्यशिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येईल.

या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, 'महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहेराज्याच्या कानाकोप-यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणेसुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणेआर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाहीत्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी अंतर्गत जनसुनावणीला पोलिसप्रशासनविधी सल्लागारसमुपदेशकजिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येतेयातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.

०००००००

Tuesday, 28 October 2025

फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन



फेब्रुवारीमध्ये जागतिक स्तरावरील ‘मुंबई क्लायमेट वीक’चे मुंबईत आयोजन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

·         १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजन

·         तीसहून अधिक देशांमधील अभ्यासकपर्यावरण तज्ज्ञआणि धोरणकर्त्यांचा समावेश

 

मुंबई दि. २८ : वातावरणीय बदल आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात भारताचे नेतृत्व अधोरेखित करणारी मुंबई वातावरण सप्ताह - मुंबई क्लायमेट वीक’ ही जागतिक स्तरावरील परिषद पुढच्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईत होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

हा महत्त्वाकांक्षी उपक्रम ‘प्रोजेक्ट मुंबई’ या संस्थेच्या संकल्पनेतून साकारला जात असून महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभाग आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात येणार आहे. मंत्रालयातील समिती कक्षात आयोजित बैठकीत मुख्यमंत्री  फडणवीस यांनी या उपक्रमाची घोषणा केली. यावेळी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडेमहापालिका आयुक्त भूषण गगराणीविभागाच्या सचिव जयश्री भोजप्रोजेक्ट मुंबईचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी आदी उपस्थित होते.

      विकसनशील देशांतील वातावरणीय बदलअन्न व ऊर्जा टंचाईच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून विकास आणि पर्यावरणीय कृती यांच्यात संतुलन साधण्यासाठी तो प्रभावी भूमिका बजावेलअसा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई क्लायमेट वीकचा मुख्य कार्यक्रम १७ ते १९ फेब्रुवारी२०२६ या कालावधीत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमुंबई येथे पार पडेल. त्याचबरोबर या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी होता यावेयासाठी शहरभर विविध प्रदर्शनेकार्यशाळाचित्रपटकलाक्रीडाआरोग्य आणि अध्यात्म यांच्याशी निगडीत  उपक्रमआणि क्लायमेट फूड फेस्टिव्हल सारखे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

या परिषदेत ग्लोबल साऊथमधील ३० पेक्षा अधिक देशांमधील प्रतिनिधी सहभागी होणार असून यामध्ये व्यवहार्य असा हवामान बदल कृती कार्यक्रम तयार करण्यात येईल. विशेष म्हणजे हा कार्यक्रम राज्यांचे मुख्यमंत्रीविविध शहरांचे प्रतिनिधीउद्योगसामाजिक संस्थाविद्यार्थी आणि युवक यांच्या सहभागातून तयार करण्यात येणार आहेअशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी फडणवीस यांच्या हस्ते मुंबई क्लायमेट वीकच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. तसेच या उपक्रमाची चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबई हवामान सप्ताह कृतीसह नेतृत्व करण्याच्या भारताच्या दृढनिश्चयाचे प्रदर्शन करतो. माननीय पंतप्रधानांनी ठरवलेल्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊनमुंबई आणि महाराष्ट्र जागतिक दक्षिणेसाठी न्याय्यनाविन्यपूर्णचांगल्या निधीसह हवामान भविष्य घडवण्यास मदत करण्यास तयार आहेत.

ग्लोबल साउथमधील वातावरणीय कृती आणि सहकार्य या क्षेत्रामधील भारताचे नेतृत्व सिद्ध करणारे मुंबई क्लायमेट वीक हे मोठे व्यासपीठ ठरणार आहेअसेही मुख्यमंत्री  फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीमुंबईत पहिल्यांदाच "मुंबई क्लायमेट वीक" कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. आता कृती करण्याची वेळ आली आहे.

 यासाठी आपण समाजातील प्रत्येक व्यक्तीलाप्रत्येक व्यवसायाला आणि जीवनाच्या सर्व स्तरांना हवामान बदलाच्या परिणामांविरुद्ध मोहिमेत सहभागी व्हावे लागणार आहे. तसेच त्यांना कृतींद्वारे बदल कसे कमी करायचे हे प्रत्यक्षात सांगावे लागणार आहे.

"मुंबई क्लायमेट वीक" कार्यक्रम आयोजित केल्यानंतर आपल्याला महाराष्ट्र आणि मुंबईसाठी बेंचमार्क देखील निश्चित करावे लागतीलहवामान बदलाच्या क्षेत्रात कृती करण्यासाठी काही ध्येये निश्चित करावी लागतील. त्यासाठी आजपासून कृती सुरू करूया असेही ते म्हणाले.

तीसहून अधिक देशांमधील अभ्यासकपर्यावरण तज्ज्ञआणि धोरणकर्ते मुंबई क्लायमेट वीकच्या व्यासपीठावर एकत्र येऊन वातावरणीय बदलावरच्या सर्वंकष आणि व्यवहार्य उपाययोजना शोधण्याचा प्रयत्न करतील. हा उपक्रम भारत आणि विकसनशील राष्ट्रांचा आवाज जागतिक स्तरावर पोहोचविणारा ठरेलअसेही ते म्हणाले.

मुंबई क्लायमेट वीकचा भर अन्न प्रणालीऊर्जा संक्रमण आणि शहरी सक्षमता या तीन प्रमुख विषयांवर असेल. न्यायनवोन्मेष आणि वित्तीय दृष्टीकोनातून हे विषय सखोलपणे मांडले जातील.

‘प्रोजेक्ट मुंबई’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी शिशिर जोशी यांनी कार्यक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले कीमुंबई क्लायमेट वीक हा महाराष्ट्र आणि भारतासाठी एक ऐतिहासिक टप्पा असणार आहे. वातावरणीय  बदलाला तोंड देण्यासाठी लोकसहभागावर आधारित असे शाश्वत आणि समावेशक उपाय या परिषदेतील मंथनातून तयार होतील.

या उपक्रमाचे नॉलेज पार्टनर मॉनिटर डिलॉईट असणार असून क्लायमेट ग्रुपइंडिया क्लायमेट कोलॅबोरेटिव्हवर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिस्ट्यूट (इंडिया)एव्हरसोर्सएचटी पारेख फाउंडेशनयुनिसेफशक्ती फाउंडेशनरेनमॅटर फाउंडेशननॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट आणि राष्ट्रीय सेवा योजना यासारख्या संस्था यात सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव अश्विनी भिडेसचिव डॉ.श्रीकर परदेशीमुख्यमंत्र्यांचे मुख्य आर्थिक सल्लागार कौस्तुभ धवसेप्रोजेक्ट मुंबईचे सल्लागार मंडळ सदस्य रिधम देसाईजलज दाणी आदी यावेळी उपस्थित होते.

0000