Search This Blog

Monday 4 May 2020

शासकीय योजनांचे पैसे घेऊन पोस्टमन आपल्या दारी


कोरानाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर डाक विभागाचा पुढाकार
चंद्रपूर,दि.4 मे: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर  संचार बंदीच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडता येईना.तसेच आवश्यक कामासाठी निघाल्यास सोशल डिस्टसिंगचे पालन  करणे बंधनकारक आहे.अशा परिस्थितीत बँक खात्यात जमा असलेले पैसे घरपोच देण्याचे काम इंडिया पोस्ट बँक मार्फत केल्या जात आहे. अशी माहिती एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे चंद्रपूर डाक विभागानी दिली आहे.
काही दिवसापूर्वी शेतकऱ्यांचे  अनुदान व महिलांच्या नावे असलेल्या खात्यांमध्ये काही योजनेची (जनधन योजनाप्रधानमंत्री गरीब कल्याण योजनाकिसान सन्मान योजनासंजय गांधी निराधार योजनाश्रावणबाळ योजनाइतर पेंशन योजना) रक्कम जमा करण्यात आलेली आहे.त्यामुळे हि रक्कम मिळविण्यासाठी मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँक समोर ग्राहकांच्या रांगा लागल्या आहे.त्यामुळे सोशल डिस्टसिंगचे उल्लंघन झाल्याचे दिसून येत आहे.
त्यावर मात करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक हा पर्याय निवडण्यात आला आहे.ग्राहकांचे मूळ बँक बरोबर इंडिया पोस्ट पेमेंट बँक  कडून रक्कम मिळविण्याची सुविधा देण्यात येत आहे.विशेष म्हणजे पोस्ट विभागाचे कर्मचारी घरपोच सुविधा देत आहे.
ग्रामीण भागात  एटीएमची  सुविधा उपलब्ध नसल्यामुळे बँक शाखेमध्ये जाणे ग्राहकांना बंधनकारक असते.
           सध्या मात्र संचारबंदीमुळे घराबाहेर पडता येत नाही.अशा परिस्थितीत इंडिया पोस्ट पेमेंट बँक ग्राहकांच्या मदतीला धावून येत आहे.चंद्रपूर विभागातील चंद्रपूर व गडचिरोली मध्ये ही सुविधा शहरी भागातील 54 व ग्रामीण भागातील 604 पोस्ट ऑफिस मध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी त्याचा आधार क्रमांक आणि रजिस्टर मोबाईल नंबर नजीकच्या पोस्ट ऑफिस मध्ये उपलब्ध करुन दिल्यास त्याच्या खात्यावरील पैसे काढणे सोयीचे झालेले आहे.
या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा,असे आवाहन चंद्रपूर डाक विभागातर्फे करण्यात येत आहे. हे सर्व करीत असताना सोशल डिस्टसिंगचे तसेच सानिटायझेशन करण्याची खबरदारी घेतली जात आहे.
00000

No comments:

Post a Comment