Search This Blog

Tuesday 5 May 2020

मिरची तोड मजुरांच्या मदतीसाठी तेलंगणा सिमेवर धावले पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार




तीन दिवसात 20 हजार मजुर स्वगावी रवाना
चंद्रपूर, दि 4 मे : केंद्र व राज्य शासनाने परराज्यात अडकलेल्या मजुरांना स्वगृही जाण्याची परवाणगी देताच तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात अडकून असलेले चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील हजारो मिरची तोडणारे कामगार मिळेल त्या वाहनाने तेलंगणाच्या सिमेवर येत होते. या मजूरांना त्यांच्या स्वगावी जाण्यासाठी तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सिमेवरावी जाण्यासाठी कसलीही वाहन व्यवस्था नसल्याने या ठिकाणी हजारो मजूर अडकून पडले होते. दोन्ही जिल्हयाचे पालकमंत्री व राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना माहीत होताच त्यांनी मदतीचा हात पुढे केला. दोन्ही राज्याची सिमा असलेल्या लकडकोट व पोडशा या ठिकाणी अनेक वाहनांची सोय करून नागपूर वरून थेट लकडकोट व पोडशा या ठिकाणी स्वत: धाव घेवून मदतीचा हात दिला. हजारो मिरची तोड मजूरांची विचारपूस करून त्यांना पिण्याच्या पाण्याची, जेवनाची व्यवस्था केली. मिळेल त्या वाहनांने त्यांच्या स्वगावी पोहचविण्याची व्यवस्था केली. गेल्यास तीन दिवसात जवळपास 15 हजार मजूर त्यांच्या स्वगृही पोहचले. या मदतीमुळे हजारो मजूरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलेले. यावेळेस त्यांच्या सोबत खासदार बाळू धानोरकर, राजूराचे आमदार सुभाष धोटे हे होते.
चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील जवळपास 25 ते 30 हजार मजूर मिरची तोडण्याच्या मजूरीसाठी जानेवारीच्या पहिल्या आठवडयात तेलगंणा व आंध्रप्रदेशात गेले होते. कोविड-19 या विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी 24 मार्चला देशात संचारबंदी लागू करण्यात आली. परिणामी तेलगंणा व आंध्रप्रदेश राज्यात चंद्रपूर व गडचिरोली  जिल्हयातील हजारो मिरचीतोड कामगार गेल्या चार महिन्यापासून अडकले आहेत.
हे सर्व मजूर अल्पभुधारक शेतकरी, शेतमजूर आहेत. खरीप हंगामाच्या पुर्वयारीला सुरूवात झाली असून त्यांच्या शेतातील कामे खोळंबली जाणार आहे. या मजुरांचे वृध्द आईवडील, मुले हे त्यांच्या स्वगावी असल्याने दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीमूळे मजुरांची अवस्था दयनिय  झाली आहे. त्यामुळे या मजुरांना त्यांच्या स्वगावी आणण्‍यासाठी  राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री व दोन्ही जिल्हयाचे पालकमंत्री  ना. विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारकडे लेखी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला. केंद्र व राज्य शासनाने परराज्यात अडकलेल्या मजुरांना स्वगृही जाण्याची परवाणगी देण्याबाबत घोषणा केली. त्यामुळे तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यात अडकून असलेले चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील हजारो मजूर मिळेल  त्या वाहनाने दोन्ही राज्याची सिमा असलेल्या लकडकोट व पोडसा या ठिकाणी येवू लागले.
 मात्र अचानक आलेला मजुरांचा लोंढा कसा रोखायचा यांना घरी कसे पोहचवावे याचा प्रशासन विचार करीत होते. काही मजूर पैदलच आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले. यातील काही मजूरांनी विजय वडेट्टीवार यांना मोबाईल करून आपली आपबिती सांगितली. अशावेळी सामान्य परिस्थितीतून आलेल्या ना. विजय वडेट्टीवार यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वखर्चातून वाहनाची व्यवस्था लकडकोट व पोडसा या गावी केली. ते स्वत: नागपूर वरून लकडकोट व पोडशा येथे जावून मजूरांची आस्तेने विचारपूस केली.
गेल्या तीन दिवसात चंद्रपूर जिल्हयातील सिंदेवाही, ब्रम्हपूरी, सावली, नागभीड, चिमूर, मूल यासह अनेक तालुक्यातील तसेच गडचिरोली जिल्हयातील गडचिरोली, चामोर्शी, कुरखेडा, आरमोरी, वडसा या सह अनेक तालुक्यातील जवळपास 20 हजार मजूरांना त्यांच्या गावी पोहचविण्यात आले. यावेळेस काही मजूरांनी वाहनधारक पैसे मागत असल्याची तक्रार मंत्री महोदयाकडे करताच त्यांनी कोणत्याही मजूरांनी पैसे देता कामा नये, ही सर्व सेवा विनामुल्य आहे. असे स्पष्ट पणे सांगीतले. लकडकोट व पोडशा येथे हजारो मजूरांचे आगमन होत असल्याचे बघून दोन्ही जिल्हयातील मिळेल ते वाहने या मजूरांसाठी उपलब्ध करून देत होते. यासाठी स्वखर्चातून यावाहनामध्ये डिझेल भरण्याचे काम पालकमंत्री महोदयांचे कर्मचारी करीत होते. या सर्व प्रकारामूळे मजुरांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
000000

No comments:

Post a Comment