Search This Blog

Monday, 8 October 2018

मुद्रा योजनेतून चंद्रपूर जिल्हयात 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा : ना.सुधीर मुनगंटीवार


 चंद्रपूर, दि.07 ऑक्टोंबर - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असणा-या मुद्रा योजनेतून जिल्हयामध्ये मोठया प्रमाणात उद्योग व्यवसायाला चालना मिळतांना सुशिक्षित बेरोजगारांची संख्या कमी झाली पाहिजे. मुद्रा योजनेचे उद्दिष्ट गाठतांना सामाजिक भान ठेवण्यासाठी यंत्रणेने समाजाच्या आर्थिक व औद्योगिक जाणीवांचे भान ठेवले पाहिजे. चंद्रपूर जिल्हा या योजनेत आदर्श जिल्हा म्हणून पुढे आणतांना या वर्षामध्ये किमान 10 हजार व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध करण्याचे नियोजन करा, असे निर्देश  राज्याचे वित्तनियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.   
            स्थानिक नियोजन भवनात आयोजित मुद्रा बँक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. मुद्रा बँक योजना राबवितांना बँकांना पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. यासाठी परिसरातल्या लोकप्रतिनिधीनी देखील यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे. खानापूर्ती करण्यासाठी ही योजना नसून यातून खरोखर उद्योजक उभे झाले पाहिजे. गुजरात मध्ये हा प्रयोग यशस्वी झाला आहे. प्रत्येक सुशिक्षित बेरोजगाराला नौकरी मिळू शकत नाही. त्यामुळे ज्यांना उद्योग धंदयाची आवड आहे त्या सर्वांना यातून संधी दिली गेली पाहिजेअसेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाच्या व्यासपिठावर आमदार अनिल सोलेआमदार नानाभाऊ शामकुळेमहापौर अंजलीताई घोटेकरजिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनारजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरमनपा आयुक्त संजय काकडे,अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रेजिल्हा अग्रणी बॅंकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर जिल्हयातील उपलब्ध असणा-या सर्व राष्ट्रीयकृत बँकांनी आपआपल्या भागातील उद्दिष्ट निश्चित करावे. मुद्रा बँक कर्ज देणारात्याची परतफेड करणारा आणि त्यातून उद्योग उभारणारा उमेदवार देण्याचे काम सार्वजनिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुढे येवून केल्यास मुद्रा मधील योग्य उमेदवारांना लाभ मिळणे व या योजनेचा योग्य वापर होणे शक्य आहे. यासाठी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांतील पदाधिका-यांनी पुढाकार घ्यावाअशी सूचनाही त्यांनी  केली. यासोबतच या योजनेच्या प्रचार प्रसिध्दीसाठी सर्व यंत्रणांनी पुढे येण्याबाबतही त्यांनी सांगितले.
यावेळी आमदार नानाभाऊ शामकुळे यांनी जिल्हयातील सार्वजनिक सहभागाच्या उद्योग धंद्याना तसेच अनेक लोकांना एकाचवेळी मोठया प्रमाणात रोजगार मिळणा-या सर्व व्यापक उद्योगांना या योजनेतून लाभ मिळावा. त्यासाठी अशा लाभार्थ्यांच्या यशकथा मांडण्याचे आवाहन केले.

यावेळी मुद्रा योजना यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर जिल्हयातील कोणते उद्योग उपयोगी पडू शकतात. त्यासाठी अन्य विभागाची मदत देखील घ्यावीअसे आवाहन आमदार अनिल सोले यांनी केले.
मुद्रा योजनेचे चंद्रपूर जिल्हयातील योगदान

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हा अग्रणी बँकेचे महाव्यवस्थापक एस.एन.झा यांनी चंद्रपूर जिल्हयामध्ये गेल्या दोन वर्षात मुद्रा योजनेतून वाटप करण्यात आलेल्या कर्ज पुरवठयाबाबतही माहिती दिली. मुद्रा योजनेतून 2018-18 या आर्थिक वर्षामध्ये चंद्रपूर जिल्हयात 17 हजार 500खातेदारकांना 160 कोटी रुपयाचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. तर 1 एप्रिल 2018 पासून सप्टेंबर महिना अखरेपर्यंत 70 कोटी रुपये वाटप करण्यात आले आहे. या योजनेसाठी तीन गट असून कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून यासाठी सुलभतेने कर्ज उपलब्ध केल्या जाते.     

No comments:

Post a Comment