हजारोंच्या संख्येतील युवकांच्या शिस्तबद्धपद्धतीने मुलाखती
मुलींची लक्षणीय उपस्थिती, अनेकांना लगेच अॅपॉइन्मेंट लेटर
मुलींची लक्षणीय उपस्थिती, अनेकांना लगेच अॅपॉइन्मेंट लेटर
चंद्रपूर दि 28 : बल्लारपूरच्या बीआयटी कॉलेजमध्ये रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने हजारों युवकांची गर्दी बघायला मिळाली. मात्र या गर्दीमध्ये शिस्त होती अनेकांना जागेवरच निवडीचे पत्र देखील मिळाले. तर या हायटेक रोजगार महामेळाव्याच्या शानदार उद्घाटन सोहळ्यात एकाच दिवशी मुलाखत व त्याच वेळी त्यांच्या हातात निवडीचे पत्र अशा आनंदाच्या क्षणाला ही अनुभवता आले.
चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने या मेळाव्यात मुलुख चांदा व हॅलो चांदा या दोन अॅपचा शुभारंभ केला.राज्याचे वित्त ,नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारात नागपूरचे फॉर्च्यून फाऊंडेशन, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय चंद्रपूर , जिल्हा प्रशासनाचे विविध विभाग प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना जिल्हा समन्वय समिती, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमांमध्ये आयोजनातील शिस्त सर्वत्र दिसून आली. हजारो विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आगमन झाल्यानंतरही एकाच वेळी शेकडो लोकांच्या मुलाखती झाल्या.
त्याच वेळी त्यांच्या हातात निवड पत्र देण्याची प्रक्रिया सुद्धा पार पाडण्यात आली.आज झालेल्या उद्घाटन सोहळ्यामध्ये जिल्हा प्रशासनाच्या दोन उपयुक्त ॲपचा देखील शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी जिल्ह्यातील जनतेला सर्व शासकीय योजनांची माहिती व्हावी व पर्यटनात अग्रेसर असणारा जिल्हा चंद्रपूरची त्या क्षेत्रात ॲपच्या माध्यमातून आगेकूच व्हावी, यासाठी अॅपची निर्मिती केली आहे .
चंद्रपूर जिल्हा माहिती कार्यालयामार्फत या ॲपची संकल्पना पूर्ण करण्यात येत असून नागरिकांच्या हातात आलेल्या स्मार्टफोनच्या माध्यमातून जिल्ह्याची माहिती, योजनांची माहिती, लाभार्थ्यांसाठी असणाऱ्या योजना, त्यासाठीची पात्रता, त्याकरिता लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती, हातातील मोबाईलमध्ये उपलब्ध व्हावी आणि जिल्हा प्रशासनाचा थेट संवाद सामान्य नागरिकांशी प्रस्थापित व्हावा यासाठी हा प्रयत्न आहे.
या दोन अॅप पैकी मुलुख चांदा हे ॲप चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटनाला व सांस्कृतिक वारशाला लोकांपर्यंत पोचविण्याच्या कामात उपयोगी येणार आहे. तर हॅलो चांदा हे ॲप शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती देणारे आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असणारे हे ॲप प्रशासनामार्फत लवकरच विकसित करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक माहिती आपल्या मोबाईलवरच मिळावी, ही यामागची भूमिका आहे .याशिवाय जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावी योजना असणारी १५५३९८ या टोल फ्री क्रमांकाची हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा देखील लवकरच यांच्यामार्फत अधिक सुलभ करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.
या दोन अॅप पैकी मुलुख चांदा हे ॲप चंद्रपूर जिल्ह्याच्या पर्यटनाला व सांस्कृतिक वारशाला लोकांपर्यंत पोचविण्याच्या कामात उपयोगी येणार आहे. तर हॅलो चांदा हे ॲप शासनाच्या विविध योजनांच्या संदर्भात माहिती देणारे आहे. सध्या प्राथमिक स्तरावर असणारे हे ॲप प्रशासनामार्फत लवकरच विकसित करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील नागरिकांना आवश्यक माहिती आपल्या मोबाईलवरच मिळावी, ही यामागची भूमिका आहे .याशिवाय जिल्ह्यातील सर्वाधिक प्रभावी योजना असणारी १५५३९८ या टोल फ्री क्रमांकाची हॅलो चांदा पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा देखील लवकरच यांच्यामार्फत अधिक सुलभ करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत.
जिल्हा माहिती कार्यालयातर्फे जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत सप्टेंबर अखेरपर्यंत माफ करण्यात आलेले कर्ज व शेतकऱ्यांना या हंगामात देण्यात आलेल्या पीक कर्ज वाटपाबाबतची घरी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे.याशिवाय अण्णासाहेब साहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यातर्फे जिल्ह्यांमध्ये सुरू असलेल्या कर्जवाटपातबाबत माहिती देणाऱ्या घरी पुस्तिकेचे देखील प्रकाशन करण्यात आले.याशिवाय या रोजगार मेळाव्याचे वैशिष्ट्य असणारे सहा मिशनबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी धोरणात्मक निर्णय उद्घाटनप्रसंगी जाहीर केले.यावेळी त्यांनी मिशन सेवा ,मिशन स्वयंरोजगार, मिशन कौशल्य, विकास ,मिशन फोरेन सर्विसेस, मिशन उन्नत शेती, मिशन सोशल वर्क ,या सहा सूत्री कार्यक्रमाचा पुनरुच्चार केला. यापैकी एक असणाऱ्या मिशन सेवाच्या लोगोचाही शुभारंभ करण्यात आला. सीएमफेलो या मोहिमेवर काम करीत आहे.
यावेळी मिशन सेवा अंतर्गत जिल्ह्यातील वाचनालयामध्ये उपलब्ध करण्यात येणाऱ्या पुस्तकांच्या संचाचे देखील लोकार्पण करण्यात आले. जिल्हा ग्रंथालयामार्फत हा उपक्रम राबवला जाणार आहे.या कार्यक्रमात मुद्रा बँक योजनेसंदर्भातही मोठ्या प्रमाणात स्टॉल लावण्यात आलेले आहे. या ठिकाणी बँक काऊंटर उघडण्यात आले असून मुद्रा लोन संदर्भात यामध्ये मार्गदर्शन करण्यात येत आहे. आज या योजनेतून उद्योग व्यवसाय करणाऱ्या दीडशे लोकांना मान्यवरांच्याहस्ते कर्ज वितरण करण्यात आले.
याच कार्यक्रमात बीआयटी कॉलेजमधून फूड अँड टेक्नॉलॉजी या अभियांत्रिकी शाखेत प्रथम आलेल्या सुनाली गाडगेचा सत्कार करण्यात आला. याशिवाय नाबार्ड व अंबुजा सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेल्या 160 प्रशिक्षणातून पैकी सहा लोकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.मिशन कौशल्य विकास व मिशन स्वयंरोजगार या संदर्भात श्रीकांत पाटील व सेवानिवृत्त महाप्रबंधक बँक ऑफ इंडिया श्री बालकृष्णन यांनी अनुक्रमे मार्गदर्शन केले मार्गदर्शनाचे सत्र मुख्य मंडपात घेण्यात आले या ठिकाणी बीआयटी मैदानावर येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शन करणारे महत्त्वाचे स्टॉल देखील लावण्यात आले आहेचंद्रपूर रोजगार युक्त बनविण्यासाठी सहा सूत्री कार्यक्रमाच्या आयोजन अंतर्गत उपयोगी पडतील अशा पद्धतीचे हे स्टॉल असून प्रत्येक स्टॉलवरून यासंदर्भातील माहिती पत्रक दिले जात आहे.
सोमवारी चाणक्य मंडळाचे मार्गदर्शन उद्या देखील बी आय टी मैदानावर विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे यासोबतच उद्या सकाळी 10.30 वाजता श्री आनंद देसाई व श्री लीना देशपांडे यांचे भविष्यातील रोजगार व करिअर मार्गदर्शन यावर मार्गदर्शन होणार आहे.दुपारी 11.30 वाजता चाणक्य आयएएस अकादमी मार्फत विद्यार्थ्यांना मिशन सेवा ,अर्थात स्पर्धा परीक्षा बाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी 12.30 ते 1 या दरम्यान विशेष सोशल वर्क या विषयावर जयसिंह चव्हाण यांचे मार्गदर्शन होणार आहे. दुपारी 2.30 ते 3.30 वाजता मिशन सोशल वर्क यासंदर्भात युवक कल्याण मंत्रालय नवी दिल्लीच्या सदस्य श्रीमती राणी निघोट -ब्दिवेदी यांचे मार्गदर्शन होणार आहे.
00000
No comments:
Post a Comment