Search This Blog

Saturday, 6 October 2018

सबका साथ सबका विकास या संकल्‍पनेनुसार विकास करण्‍याचा आमचा संकल्‍प - ना.सुधीर मुनगंटीवार


चिरोली येथे अंधारी नदीवर बंधारा बांधकामाचे भूमीपूजन संपन्‍न

चंद्रपूर दि 6 आक्टोबर :बांबु हा कल्‍पवृक्ष आहे. गेल्‍या चार वर्षात बांबु क्षेत्रात राज्‍य शासनाने भरीव कामगिरी केली आहे. चिचपल्‍ली येथे बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्‍थापन करण्‍याचा निर्णय आपण घेतला. काल पुण्‍यात बांबु हॅन्‍डीक्राफ्ट आर्ट युनिटचे उदघाटन राज्‍यपालांच्‍या हस्‍ते झाले. बांबु शेतीला प्रोत्‍साहन देण्‍याची भूमीका राज्‍य शासनाने घेतली आहे. या माध्‍यमातुन शेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात सुध्‍दा वाढ होणार आहे. कोणत्‍याही गावाला पुढे जायचे असेल तर त्‍या गावाचा स्‍वभाव विकसनशील असणे आवश्‍यक आहे. नवे प्रयोग स्विकारण्‍याची तयारी गरजेची आहे. चिरोली गावात अंधारी नदीवर बंधारा बांधण्‍याचे काम सुरू झाले आहे. याचा सदुपयोग करण्‍याची जबाबदारी आता नागरिकांची असल्‍याचे प्रतिपादन राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.पंतप्रधानांच्‍या सबका साथ सबका विकास या संकल्‍पनेनुसार जिल्हाला सर्वाधिक विकसित करण्‍याचा संकल्‍प आम्‍ही केला असल्‍याचेही ते म्‍हणाले.
      दिनांक 6 ऑक्‍टोबर रोजी मुल तालुक्‍यातील चिरोली येथे राज्‍यसभा सदस्‍य खा. अनु आगा यांच्‍या खासदार स्‍थानिक विकास निधीतुन बांधण्‍यात येत असलेल्‍या 1 कोटी 93 लक्ष रू. किंमतीच्‍या 90 मीटर लांबीच्‍या  बंधा-याचे ना. भुमीपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी ज्‍येष्‍ठ नागरिक प्रमोद बोनगीरवारअप्‍पर मुख्‍य सचिव तथा चंद्रपूर जिल्‍हयाचे पालक सचिव प्रविणसिंह परदेशीजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेडॉ. जिल्‍हाधिकारी कुणाल खेमनारजिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकरसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मनोज जयस्‍वालजिल्‍हा परिषद सदस्‍य पृथ्‍वीराज अवताडेपंचायत समिती सदस्‍या  वर्षा लोनबलेचिरोलीच्‍या सरपंच कविता सुरमवारमुल नगर परिषदेचे उपाध्‍यक्ष नंदू रणदिवेप्रभाकर भोयरटोलेवाहीच्‍या सरपंच  मंजुषा बोंडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
बल्‍लारपूर विधानसभा मतदार संघ हा राज्‍यातील सर्वाधिक विकसित मतदार संघ ठरावा असा आपला प्रयत्‍न असल्‍याचे सांगत   ना. सुधीर मुनगंटीवार पुढे म्‍हणालेहा मतदार शंभर टक्‍के आरोयुक्‍तशंभर टक्‍के एलपीजी गॅसयुक्‍तशंभर टक्‍के बस प्रवासी निवारा शेडयुक्‍त करण्‍याचा आपला मानस आहे. बीपीएल धारकांच्‍या शिधापत्रिकांवर ज्‍या प्रमाणे स्‍वस्‍त दरात धान्‍य दिले जाते त्‍याच धर्तीवर एपीएल कार्डधारकांना सुध्‍दा धान्‍य देण्‍याचा प्रयोग मिशन दिनदयाल अंतर्गत आपण चंद्रपूर जिल्‍हयात राबविणार आहोत. मिशन आरोग्‍य च्‍या माध्‍यमातुन जिल्‍हयातील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे उत्‍तम व सर्व सुविधांनी युक्‍त करण्‍यासोबतच कोणताही नागरिक गरीब आहे म्‍हणून कोणत्‍याही उपचारापासून वंचित राहू नये अशी सक्षम आरोग्‍य यंत्रणा आपण उभी करणार आहोत. आयुष्‍यमान भारतमहात्‍मा फुले जनआरोग्‍य योजना या आरोग्‍य विषयक योजनांची चंद्रपूर जिल्‍हयात प्रभावी अंमलबजावणी करत मिशन आरोग्‍यावर आपण भर देणार असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले
        टाटा ट्रस्‍ट च्‍या सहकार्याने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील 5 हजार शेतक-यांसाठी सधन शेतकरी प्रकल्‍प राबवित असल्‍याचे सांगत ते पुढे म्‍हणालेशेतक-यांच्‍या उत्‍पन्‍नात वाढ करण्‍यासाठी आपण राबवित आहोत. सिंदेवाही येथे नोव्‍हेंबर महिन्‍यात धान संशोधन शिबीर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन राबविण्‍यात येणार आहे. उथळपेठ या गावाला आदर्श गाव म्‍हणून मी दत्‍तक घेतले आहे. या गावात सोलर ऊर्जेचा प्रयोग आपण राबविणार असून यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्‍ट च्‍या सीएसआर च्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करण्‍याचे आश्‍वासन ज्‍येष्‍ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगीतले.
चिरोली येथील अंधारी नदीवर बंधारा बांधण्‍याची संकल्‍पना ज्‍येष्‍ठ नागरीक प्रमोद बोनगिरवार यांनी मांडली व प्रविणसिंह परदेशी यांनी ती संकल्‍पना पुढे नेली. त्‍या माध्‍यमातुनच आज या बंधा-याचे भुमीपूजन होत असल्‍यामुळे प्रमोद बोनगिरवार व  प्रविणसिंह परदेशी यांचे आभार अर्थमंत्र्यांनी व्‍यक्‍त केले. समाजाप्रती अशी जागरूकतेची भावना निर्माण होणे आज गरजेचे झाले असल्‍याचेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. 
000

No comments:

Post a Comment