Search This Blog

Tuesday 23 October 2018

बल्लारपूरच्या महारोजगार मेळाव्यासाठी तिसऱ्या दिवशी 7 हजार युवकांची नोंदणी

·         दिवसात 17 हजार युवकांचा प्रतिसाद
·         बल्लारपूरचे  बीआयटी इन्स्टिट्यूट युवा शक्तीच्या स्वागतासाठी होत आहे सज्ज
·         ऑनलाइन रजिस्ट्रेशनला अपेक्षेपेक्षा अधिक मिळत आहे प्रतिसाद
·         बल्लारपूरला लवकरच करियर कौन्सिलिंग सेंटर होणार

चंद्रपूर दि 20 ऑक्टोबर : नोकरी,मुद्रा लोनप्रशिक्षणमार्गदर्शन आणि ख्यातनाम वक्त्यांना ऐकण्याची संधी  देणारे बल्लारपूर येथील महा रोजगार मेळाव्याचे  आयोजन ऑनलाईन रजिस्ट्रेशन मुळे लक्षवेधी ठरत आहे.चंद्रपूर सारख्या मागास समजल्या जाणाऱ्या भागांमध्ये देखील  सुशिक्षित बेरोजगारांनी  या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला उदंड प्रतिसाद देत  तिसऱ्याच दिवशी सतरा हजारापर्यंत नोंदणी केली आहे .आयोजकांना अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिसाद या ऑनलाईन नोंदणी साठी मिळत आहे.         राज्याचे अर्थ ,नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने 28 व 29 ऑक्टोबरला  युथ एम्पॉवरमेंट समिट अर्थात रोजगार महामेळावा बल्लारपूर शहरात होत आहे . www.yeschandrapur.com/register.aspx या वेबसाईटवर 25 ऑक्टोंबरच्या सायंकाळपर्यंत बेरोजगारांनी नोंदणी करणे अनिवार्य आहे. पहिल्या दोन दिवसातच  दहा हजारावर नोंदणी करण्यात आली होती.तिसर्‍या दिवशी मात्र  सात हजारापर्यंत हा आकडा वाढला असून  24 च्या दुपारी बारा वाजेपर्यंत 20 हजारावर नोंदणी होण्याची अपेक्षा आयोजकांना आहे.केवळ चंद्रपूर जिल्ह्यातील युवकांना आपल्या आवडीच्या क्षेत्रात नोकरीरोजगार,मार्गदर्शनप्रशिक्षण आणि मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज मिळवण्याची व्यवस्था या महामेळाव्यात करण्यात आली आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  मार्गदर्शन केंद्रडॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर ,आमदार अनिल सोले अध्यक्ष असणारी फॉर्च्यून फाउंडेशन ही संस्था या कार्यक्रमाचे आयोजक आहेत. या कार्यक्रमाला देशातील मान्यवरांचे मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रासाठी मिळणार आहे. बल्लारपूर येथील बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मौजा बामणी येथे होणाऱ्या या बेरोजगारांच्या महामेळाव्यांमध्ये मिशन सेवामिशन स्वयंरोजगारमिशन कौशल्य विकासमिशन फोरेन सर्विसेसमिशन उन्नत शेतीमिशन सोशल वर्क ,आदी विषयावर ज्येष्ठ तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.मुंबईपुणे ,औरंगाबाद येथील विख्यात 50 औद्योगिक कंपन्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुलांना आपल्या आस्थापनावर संधी देणार आहेत. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा बँक योजना अंतर्गत योग्य उमेदवारांना कर्ज देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व बँका या ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. या सर्व आयोजनाचा जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावाअसे आवाहन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
बल्लारपूर युवकांसाठी मार्गदर्शन केंद्र होणार 28 व 29 तारखेला होणाऱ्या मोठ्या रोजगार मेळाव्यास सोबतच बल्लारपूर मध्ये युएनडीपी या संस्थेचे करिअर मार्गदर्शन केंद्र पुण्यातील एका स्वयंसेवी संस्थेमार्फत कायमस्‍वरुपी चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी काळात बल्लारपूर येथे नोकरी व भवीष्य घडविणारे समुपदेशन केंद्र देखील कार्यान्वित होणार आहे. त्याची मुहूर्तमेढ या मेळाव्या दरम्यान रोवली जाणार आहे. दरम्यान, आज बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा,सभापती ब्रिजभूषण पाझारे व आयोजनातील मान्यवरांनी बल्लारपूर बी आय टी कॉलेज परिसरात भेट देऊन कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. पंचवीस हजारावर विद्यार्थी या ठिकाणी रोजगार मेळाव्याला उपस्थिती लावतील ,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बीआयटी कॉलेजमध्ये मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहेत.                                        
000

No comments:

Post a Comment