Search This Blog

Tuesday, 23 October 2018

चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी 42 अतिक्रमण धारकांना एकमुस्त रक्कम देणार

उड्डाणपूल पूर्ण होण्यासाठी मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

चंद्रपूर दि 23 नोव्हेंबर : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ रेल्वे उड्डाणपुलासाठी  राज्याच्या मंत्रिमंडळात आवश्यक प्रस्ताव पारित करण्यात आला. शहरासाठी महत्त्वाचा प्रश्न असलेल्या या उड्डाणपुलाचा दीर्घकाळ रेंगाळलेला गुंता सोडविण्यात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना यश आले असून या अतिक्रमणधारकांना एकमुस्त रक्कम दिली जाणार आहे.
        गेल्या अनेक दिवसांपासून रेंगाळलेल्या या प्रश्नाला कायमचे सोडविण्यासाठी राज्य शासनाने एक वेळची विशेष बाब म्हणून हा निर्णय घेतला आहे. कोणत्याही शासकीय मदतीसाठी अपात्र ठरवण्यात आलेल्या या अतिक्रमण धारकांना देण्यात आलेली ही मदत आहे.तथापि ही बाब अन्य कुठेही पूर्व उदाहरण म्हणून वापरण्यात येऊ नये असेही या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे. चंद्रपुरातील या अतिक्रमणधारकांना ही मदत मिळत असली तरी मूळ शासकीय आदेशानुसार यापुढेही अन्य उदाहरणांमध्ये अतिक्रमण नियमाकुल करण्यास पात्र नसतील तर त्यांना कोणताही मोबदला देण्यात येऊ नयेही राज्य शासनाची भूमिका कायम असणार आहे.
        या अपात्र अतिक्रमणधारकांना चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत एक मुस्त मोबदला दिला जाणार आहे. तथापि, हा मोबदला देत असताना चंद्रपूर महानगरपालिकेने या अपात्र अतिक्रमण धारकांकडून याबाबत प्रतिज्ञापत्र घेणे आवश्यक आहे. सदर निर्णय अत्यंत अपवादात्मक बाब म्हणून सार्वजनिक हिताच्या व तातडीच्या या एकमेव प्रकल्पासाठी घेतला जात असल्याचेही मंत्रिमंडळाच्या या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.
                 पालक मंत्री सुधीर मुनगंटीवारआमदार नानाभाऊ शामकुळे यांनी याबाबतीत गेल्या अधिवेशनादरम्यान झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये देखील या अपात्र अतिक्रमणधारकांना तातडीने हटविण्याबाबत मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली होती. शहराच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी ही बाब आवश्यक असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले होते. त्यामुळे या अपात्र 42 अतिक्रमणधारकांना एक मुस्त मोबदला देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.
000

No comments:

Post a Comment