Search This Blog

Saturday, 20 October 2018

वरोरा येथे विद्यार्थ्‍यांसाठी ई-लायब्ररी तयार करण्‍याकरिता शासन सर्वतोपरी सहकार्य करेल - सुधीर मुनगंटीवार


वरोरा येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन व लोकार्पण संपन्‍न

चंद्रपूर दि: 19 - गेल्‍या चार वर्षात चंद्रपूर जिल्‍हा विकासाच्‍या मार्गावर अग्रेसर ठरला आहे. या जिल्‍हयातील आदिवासी विद्यार्थ्‍यांनी माऊंट एव्‍हरेस्‍ट सारख्‍या उंच शिखरावर झेंडा रोवून चंद्रपूर जिल्‍हयाचे नाव जागतिक स्‍तरावर पोहचविले आहे. यापुढील काळात मिशन शक्‍तीच्‍या माध्‍यमातून ऑलिंम्पिक स्‍पर्धेमध्‍ये चंद्रपूर जिल्‍हयातील विद्यार्थी पदके प्राप्‍त करतील यादृष्‍टीने आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत तर मिशन सेवाच्‍या माध्‍यमातून प्रत्‍येक तालुका स्‍तरावर स्‍पर्धा परिक्षांची तयारी विद्यार्थ्‍यांकडून करवून घेतली जाणार आहे. वरोरा शहर व तालुक्‍यातील विद्यार्थी स्‍पर्धा परिक्षांमध्‍ये अव्‍वल ठरावे, यासाठी त्‍यांच्‍या अभ्‍यासाच्‍या दृष्‍टीने ई-लायब्ररी तयार करण्‍यासाठी नगर परिषदेने पुढाकार घ्‍यावाराज्‍य शासन त्‍यासाठी सर्वतोपरी सहकार्य करेलअशी ग्‍वाही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
दिनांक 19 ऑक्‍टोबर रोजी वरोरा नगर परिषदेतर्फे आयोजित विविध विकासकामांच्‍या लोकार्पण व भुमीपूजन समारंभानिमीत्‍त आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी महाराष्‍ट्र वनविकास महामंडळाचे अध्‍यक्ष चंदनसिंह चंदेलजिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमाजी मंत्री संजय देवतळेनगर परिषदेचे अध्‍यक्ष अहेतेशाम अलीनगरसेवक बाबा भागडेज्‍येष्‍ठ नेते चंद्रकांत गुंडावारविजय राऊतनगर परिषदेचे मुख्‍याधिकारी सुनिल बल्‍लाळन.प. उपाध्‍यक्ष अनिल झोटींगजिल्‍हा परिषदेच्‍या सभापती अर्चना जिवतोडे आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणालेचंद्रपूर जिल्‍हयातील सर्वच भागात विकासकामांसाठी मोठया प्रमाणावर निधी आम्‍ही उपलब्‍ध केला आहे. ब्रम्‍हपूरीसावलीसिंदेवाहीगोंडपिपरीजिवतीराजुराचिमूर सर्वच भागांच्‍या विकासासाठी निधी उपलब्‍ध होवून विकासप्रक्रिया गतीमान झाली आहे. जातधर्मपंथपक्ष यांच्‍या भिंती बाजूला सारून सर्वसमावेशक पध्‍दतीने सर्वांना न्‍याय देत आम्‍ही विकास प्रक्रिया राबवित आहोत. पोंभुर्णा येथे 1000 आदिवासी महिलांची कुक्‍कुटपालन संस्‍था महाराष्‍ट्रातील पहिली कुक्‍कुटपालन संस्‍था आपण स्‍थापन केली आहेमहिलांच्‍या सक्षमीकरणासाठी विविध प्रकल्‍प आपण राबवित आहोत. विकास ही सर्वांची जबाबदारी आहे. सबका साथ सबका विकास या माननीय पंतप्रधानांच्‍या निर्धारानुसार या जिल्‍हयाला राज्‍यातील प्रगत जिल्‍हा म्‍हणून पुढे नेण्‍यासाठी आपण प्रयत्‍नशील असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले.
वरोरा नगर परिषद क्षेत्रातील विकाससकामांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्‍ध केल्‍याबद्दल नगराध्‍यक्ष अहेतेशाम अली यांनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्‍यक्‍त केले आहे. यावेळी जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष देवराव भोंगळेमाजी मंत्री संजय देवतळे आदींची भाषणे झालीत. वरोरा शहरातील अत्‍याधुनिक मत्‍स्‍य विक्री बाजारपेठ व गांधी उद्यानातील योग शेड चे लोकार्पण तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पराते हॉस्‍पीटल पर्यंत सिमेंट रस्‍त्‍याचे भूमीपूजन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला मोठया संख्‍येने नागरिकांची उपस्थिती होती. 
000

No comments:

Post a Comment