Search This Blog

Saturday, 20 October 2018

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण द्वारे पूर परिस्थितीमध्ये बचावाचे प्रात्यक्षिक


चंद्रपूर दिनांक 20- चंद्रपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे दिनांक 7.10.2018 रोजी इरई धरण, चंद्रपूर येथे जिल्हा शोध व बचाव पथकानकरिता पुरामध्ये बचावाचे प्रात्यक्षिक व घरगुती साहित्यापासून पुरामध्ये बचावाचे प्रात्यक्षिक कार्यक्रम, बोटचालविण्याचे तसेच पोहोचण्याचे प्रशिक्षण तसेच पाण्यामध्ये अचानक बोट पलटी झाल्यास स्वतःचे व इतरांचे प्राण वाचवून सदर बोटीला पुन्हा सरळ करण्याचे प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
 सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार तसेच अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, निवासी उपजिल्हाधिकारी जी.एच भुगावकर यांचे मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. प्रशिक्षणामध्ये जिल्हा कार्यालयातील तहसीलदार सामान्य विलास वानखेडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी चंद्रपूर निलेश तेलतुंबडे, नैसर्गिक आपत्ती शाखेचे विवेक कोहळे तसेच जिल्हा कार्यालयातील अनेक कर्मचारी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला पोलिस विभागाचे शोध व बचाव पथक, महानगरपालिका फायर विभागाचे बचाव पथक, सीटीपीएस फायर विभागाचे बचाव पथक तसेच तालुका स्तरावरील बचाव पथकातील सदस्यांनी सहभाग घेतला. जिल्हा पोलीस मुख्यालय चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक मुत्तेमवार, पोलीस उपनिरीक्षक  मडावी च.म.औ.वि.के.चंद्रपुर फायर विभागाचे उपमुख्य अग्निशम अधिकारी सहायक अग्निशमन अधिकारी ढोमणे, सहाय्यक अग्निशमन अधिकारी खरवडे, कनिष्ठ अग्निशमन अधिकारी तीवारी, मानगुडधे तसेच फायरमन  सुरज मेश्राम. जाकीर शेख,  आर.बी.सिंग उपस्थित होते. चंद्रपूर येथील सुरक्षा शाखेचे वरीष्ठ सुरक्षा अधिकारी त्रिवेदी, सहायक सुरक्षा अधिकारी   बिरखडे, कनिष्ठ सुरक्षा अधिकारी रामटेके, पहारेकरी सुर्यंवंशी तसेच अनेक कर्मचारी उपस्थित होते.
सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी तसेच बचाव पथकातील सदस्यांना घरगुती साहित्यापासुन पूरामध्ये बचावा संबेधाने प्रात्यक्षिक करून दाखविले. घरगुती साहित्यामध्ये थर्माकॉल पासुन लाईफ जॅकेट, पिण्याचे पाणी बॉटल, घागर तसेच 2 व्हालीबॉल पासून पूरामध्ये जिव कसा वाचविला जातो याचे प्रात्याक्षिक शोध व बचाव पथकातील सदस्यांनी उपस्थितांना करून दाखविले तसेच उपस्थित शोध व बचाव पथकातील सदस्यांना पूरामध्ये बोट चालविण्याचे कौशल्य तसेच गोताखोर असलेल्या सदस्यांकडून पुराचे पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध कसा घेण्यात येतो याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले. एसडीआरएफचे पोलीस निरीक्षक प्रमोद लोखंडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. एसडीआरएफचे पोलीस उपनिरीक्षक पी.एम.नेमाने, एस.एस.जम्बेली, पशुवैद्यकीय अधिकारी पी.आर.साहारे तसेच 17 जवानांनी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक करून दाखविले.
उपरोक्त प्रशिक्षण पोलीस विभागातील शोध व बचाव पथकातील बोटचालक अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, उमेश बनकर, गिरीश मराप, वामन नक्षिणे, उपगनलावार तसेच त्यांचे जवान उपस्थित होते.
जिल्हा कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती शाखेचे अ.का.श्री. विवेक कोहळे तसेच शोध व बचाव पथकातील बोटचालक श्री. सुनिल नागतोडे, गजानन पांडे, गोवर्धन जेंगठे, शरद बनकर, अजय यादव, सुरेश दाते, रहुल पाटील, राजु निंबाळकर प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित होते.
000

No comments:

Post a Comment