Search This Blog

Monday 15 October 2018

शालेय टेनिस क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन नागपूर विभागाचा दोन गटात विजय



चंद्रपूर दि.15 ऑक्टोबर   चंद्रपूर जिल्ह्यात 15 ते 17 ऑक्‍टोबर या काळामध्ये जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु झालेल्या राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस क्रीडा स्पर्धेचे थाटात उदघाटन करण्यात आले. आज झालेल्या 14, 17 व 19 वयोगटातील स्पर्धामध्ये नागपूर विभागाने पहिल्या दिवशी विजय संपादन केले. उदया शालेय टेबल टेनिस स्पर्धेवरील विभागाचे वर्चस्व स्पष्ट होणारे आहे. या स्पर्धेला मोठया संख्येने प्रक्षेक म्हणून उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांनी केले आहे.
आज झालेल्या उदघाटन समारंभाला चंद्रपूरच्या महापौर अंजलीताई घोटेकर उदघाटक म्हणून उपस्थित होत्या. तर अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमदार अनिल सोले, अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे, विशेष कार्यकारी अधिकारी, डॉ.विजय इंगोले, महाराष्ट्र टेबल टेनिस अशो.चे कार्यकारी सदस्य ॲड.आशुतोष पोतनिस, विभागीय सचिव प्रकाश जसानी, छत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी संघटक प्रा.वसंत आकुलवार, जिल्हा टेबल टेनिस असो.चे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी,  सचिव राकेश तिवारी, जिल्हा खो-खो संघटनेचे अध्यक्ष अशोक मोरे, जिल्हा क्रीडा अधिकारी अनंत बोबडे यांची उपस्थिती होती. तीन गटामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 324 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंगला आसुटकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन अब्दुल मुस्ताक यांनी केले. मान्यवरांनी यावेळी खेळाडूंना शपथ दिली. पहिल्या दिवशीच्या खेळामध्ये 17 वर्ष वयोगटात नाशिक, क्रीडा प्रबोधिनी नागपूर, औरगांबाद, 19 वर्ष वयोगटातील मुलांच्या संघात मुंबई, लातूर, 14 वर्ष मुलांच्या गटात कोल्हापूर, क्रीडा प्रबोधिनी पुणे, अमरावती, नागपूर, 14 वर्ष मुलींच्या गटात पुणे, क्रीडा प्रबोधिनी मुंबई व अमरावती संघानी विजय मिळविला.
                                                0000

No comments:

Post a Comment