चंद्रपूर दि.20-प्रशासनातर्फे येत्या नोव्हेंबर 2018 या महिण्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला मोहिमे संदर्भात आरोग्य विभाग, जि.प, चंद्रपूर अंतर्गत जिल्हयातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रूग्णालय वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.केंद्र, आरोग्य सहाय्यक तालुका यांची गोवर रुबेला कार्यक्रमाबाबत कृती आराखडा सेंन्सीटॉयझेन कार्यशाळा मा.सा.कन्नमवार सभागृह जि.प.चंद्रपूर येथे संपन्न झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. प्रकाश साठे, जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.चंद्रपूर व डॉ. एम कामरान, डब्ल्यु.एच.ओ. कन्सलटंट यांचे प्रमुख उपस्थीतीत संपन्न झाली यावेळी मंचावर डॉ. गोवर्धन दुधे, सर्जन सा.रु.चंद्रपूर, डॉ. संदीप गेडाम, जिल्हा लसीकरण अधिकारी जि.प.चंद्रपूर, श्री.एस. मुळावार जि.का.व्य.चंद्रपूर उपस्थित होते.
भारत सरकारने सन 2020 सालापर्यंत गोवर या आजाराचे निमूर्लन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. त्यानुसार नाव्हेंबर 2018 मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत 9 महिने ते 15 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांमुलींकरीता लसीकरण करण्याचे 100 टक्के लक्ष्य निर्धारीत केले आहे. सदर मोहिम जिल्हयातील सर्व सरकारी, निमसरकारी शाळा, मदरसे, खाजगी शाळा, अंगणवाडी केंद्र या ठिकाणी राबविण्यात येणार आहे.
सदर कार्यशाळेत डॉ. एम कामरान, डब्ल्यु.एच.ओ. कन्सलटंट यांनी आपण आपल्या स्तरावर केलेल्या सूक्ष्म कृती आराखडयानुसार नियोजन करुन मोहिमेची अंमलबजावनी आपल्या कार्यक्षेत्रात करावी व एकही मूल लसीकरणापासून सुटनार नाही याची काळजी घेऊन मोहीम यशस्वी करावी अश्या सूचना दिल्या.
यावेळी डॉ. प्रकाश साठे, व डॉ. संदीप गेडाम यांनी जनतेला जागृत करुन कृती आराखडयानुसार गोवर रुबेला लसीकरण मोहिम 100 टक्के साध्य होईल याकरीता सर्वतोपरी लक्ष दयावे असे सांगीतले.
या लसीकरण मोहिमे अंतर्गंत सर्व लाभार्थ्यांना गोवर रुबेला लसीचे एक इंजेक्शन दिले जानार आहे. गोवर हा अत्यंत संक्रामक आणि घातक आजार आहे हा मुख्यत: लहान मुलांना होतो व आजारानंतर होणाऱ्या गुंतागुंतीमुळे बालकाचा मृत्यू होऊ शकतो तसेच रुबेला हा सौम्य संक्रामक आजार असून गर्भवती स्त्रियांना रुबेला आजाराचा संर्सग झाल्यानंतर अचानक गर्भपात किंवा नविन जन्म झालेल्या बाळास जन्मजात दोष अंधत्व, बहिरेपणा, हृदयविकृती यासारखे आजार होतात. तरी सदर मोहिमेबाबत विविध प्रसिध्दी माध्यमाद्वारे जनतेत जनजागृती करावी सदर लसीकरणाबाबत जनतेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
000
No comments:
Post a Comment