शक्यतो गुगल फॉर्म भरून आपली माहिती द्यावी
चंद्रपूर, दि.3 मे: महाराष्ट्र शासनाने दि. 30 एप्रिल 2020 रोजी आदेश निर्गमित करुन बाहेरच्या जिल्ह्यात, राज्यात अडकलेल्या व्यक्तींना स्वतःच्या जिल्ह्यात जाण्यासाठी अटी, शर्तीच्या अधीन राहून परवानगी दिली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन केले असून जिल्हा प्रशासनाने 10 संपर्क क्रमांक जारी केले आहे.
खालील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे:
तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात, त्या जिल्हयाच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी, तालुका प्रशासनाशी संपर्क साधने सर्वात आवश्यक आहे.ज्या जिल्ह्यात अडकले आहात ते जिल्हा प्रशासन आपल्यावतीने चंद्रपूर जिल्ह्याशी संपर्क साधनार आहे. संपर्क झाल्यानंतर तुम्ही ज्या जिल्ह्यात अडकले आहात त्या जिल्हा प्रशासनाकडून तुम्हाला प्रवास परवानगी विषयी कळविण्यात येईल. तुमची वैद्यकीय तपासणी करण्यात येईल. त्यानंतर प्रवासाची परवानगी मिळेल.(त्यामुळे आपण ज्या जिल्ह्यात अडकला आहात, तेथील जिल्हा अथवा तालुका प्रशासनाशी संपर्क साधावा. चंद्रपूर जिल्हाशी थेट संपर्क साधला तरी परवानगी देणे शक्य होणार नाही.) परवानगी मिळाल्यानंतरच प्रवासाला सुरुवात करा. तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात तेथील प्रशासनाच्या परवानगीशिवाय चंद्रपूर जिल्ह्यात कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला प्रवेश दिला जाणार नाही.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर संपर्क क्रमांक जारी:
07172-274166, 07172-274167, 07172-274168, 07172-274169, 07172-274170, 07172-274171, 07172-274172, 07172-274173, 07172-274174, 07172-274175 हे संपर्क क्रमांक 24 तास सेवा देणार आहे.
पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी विशेष कार्य अधिकारी प्रवीण देशमुख यांच्या मुख्य समन्वयात ब्रह्मपुरी, सिंदेवाही, सावली, बल्लारपूर, पोंभुर्णा या 5 तालुक्यांसाठी श्री. प्रदीप गद्देवार (8007203232).मुल, नागभीड, राजुरा, कोरपना, चिमूर या तालुक्यांसाठी श्री. उमेश आडे (9404235449). चंद्रपूर, वरोरा, जिवती,गोंडपिंपरी,भद्रावती तालुक्यासाठी श्री. सुधीर पंदीलवार (9175991100) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बाहेर राज्यात, जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी शक्यतो chanda.nic.in या संकेत स्थळावर जाऊन संबंधित दिसणाऱ्या बॅनरला क्लिक करून गुगल फॉर्म उघडेल. या गुगल फॉर्म मध्ये विचारलेली आवश्यक माहिती भरावी किंवा chandrapurhelpdesk@gmail.com या इमेल वर सुद्धा संपर्क साधता येणार आहे.
00000
No comments:
Post a Comment