Search This Blog

Monday 4 May 2020

लॉकडाऊन कायम;जाणून घ्या काय सुरू, काय बंद राहणार


चंद्रपूरदि.मे : जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन्य आजार म्हणुन घोषीत केला आहे. तसेच कोरोना विषाणुचा प्रसार भारतातमहाराष्ट्रात गतीने पसरत आहे. असे दिसून येत असल्याने  राज्य शासनाने कोरोना विषाणू (कोविड-19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दि. 13 फेब्रुवारी 2020 पासुन लागु केलेला आहे. सद्यस्थितीतही कोरोना विषाणुचा वाढता प्रकोप लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या आदेशानुसार साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू असणार आहे.
हे राहणार बंद:
फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) नुसार चंद्रपूर जिल्हयामध्ये घेण्यात येणारे सामाजिकराजकीयसांस्कृतिकधार्मीकक्रिडा विषयक प्रदर्शने व शिबीरेसभामेळावेजत्रायात्रारॅलीधरणे आंदोलनलग्न समारंभइत्यादी कार्यक्रमास मनाई करण्यात येत आहे. तसेच जनतेसही एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात येत आहे.
या आदेशानुसार सार्वजनिक स्थळी 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र जमा होऊ नये. कोरोना विषाणु (कोविड-19) च्या अनुषंगाने कोणत्याही नागरीकांनी समाजातजनमानसात अफवाअपप्रचार व भिती व्हॉटसअँपफेसबुकट्वीटरवृत्तपत्रसोशल मिडीया व होर्डिंग इत्यादींवर प्रसारीत करु नये. तसेच अधिकृत माध्यमाव्दारे माहिती न घेता दिशाभुल करणारी माहिती प्रसार माध्यमांवर प्रसारीत करु नये. धार्मीक स्वरुपाचे समुपदेशनधर्म परिषदधार्मीक गर्दीचे आयोजन करु नये.
कोरोना विषाणु (कोविड -19) चे अनुषंगाने घोषीत करण्यात आलेल्या क्वारंटाईन स्थळांच्या 100 मीटर परिसरांतर्गत एकत्रित येण्यास व हालचाल करण्यास निर्बंध घालण्यात येत आहे. खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील असे सर्व प्रकारचे मिरवणुकरॅलीलग्न समारंभसामुहिक कार्यक्रमसमारंभसांस्कृतिक कार्यक्रमसणउत्सवउरुसजत्रामनोरंजनाचे कार्यक्रमक्रीडा व इतर सर्व स्पर्धाआंदोलने इ. यांना मनाई राहील.
खाजगी व सार्वजनिक ठिकाणी 2 किंवा 2 पेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येतील अशा सर्व प्रकारची कृत्ये जसे कार्यशाळाकॅम्पप्रशिक्षण वर्गदेशांतर्गत व  परदेशी सहली इ. यांचे आयोजन करण्यासाठी मनाई राहील. दुकानेसेवा आस्थापनाउपहारगृहेखाद्यगृहेखानावळशॉपींग कॉम्प्लेक्समॉल्ससुपर मार्केटमनोरंजनाची ठिकाणेक्लब/पबक्रीडांगणेमैदानेजलतरणतलावउद्यानेसिनेमागृहेनाटयगृहेशाळामहाविद्यालयेखाजगी शिकवणी वर्गव्यायामशाळासंग्रहालयेगुटखा-तंबाखु विक्री इत्यादी बंद राहील. सार्वजनिक स्थळीकामाचे ठिकाणी मास्कचा वापर व सामाजिक अंतर ठेवणे अनिवार्य राहील. आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरीता बंद असेल. 65 वर्षावरील व्यक्ती को-मॉरबीडीटीस व्यक्ती व 10 वर्षाच्या आतील बालकेगर्भवती महिला यांनी अत्यावश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी व वैद्यकीय उद्देशाशिवाय घराबाहेर निघू नयेत.
या बाबींना आदेश लागू नाही :
            किमान मनुष्यबळासह शासकीयनिमशासकीय कार्यालयसरकारी महामंडळाचे उपक्रम,आस्थापनाअत्यावश्यक सेवेतील व्यक्तीरुग्णालयेपॅथोलॉजी लेबोरेटरीदवाखानाविमानतळ व रिक्षा थांबेबँकपेट्रोल पंप इत्यादी ठिकाणी वावरताना चेह-यावर मास्क अत्यावश्यक असेल. अंत्यविधी (कमाल 20 व्यक्तींपुरता मर्यादीत).अत्यावश्यक किराणा सामानदुग्धदुग्धोत्पादने,  फळे व भाजीपालापार्सल स्वरुपात काऊंटर तसेच इतर मार्गांनी विक्री,वितरण व वाहतुक करण्यास परवानगी राहील.
            सर्व हॉटेललॉज यांना तेथे वास्तव्यास असणाऱ्या ग्राहकांना आरोग्यविषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन रेस्टॉरंटमध्ये खाद्यपदार्थ बनवुन फक्त पार्सल सुविधा देण्यास परवानगी राहील. ज्या आस्थापना (उदा.माहिती व तंत्रज्ञान उद्योग) ज्यांच्याकडे देश-परदेशातील अतिमहत्त्वाच्या उपक्रमांची जबाबदारी आहे व सदर बंद राहिल्याने अशा उपक्रमांच्या प्रक्रियेला बाधा येऊ शकते असे सर्व संबंधित उपक्रम सुरू होऊ शकतील.(परंतु  या दृष्टीने सदर अास्थापना कार्यरत ठेवण्याच्या आवश्यकतेबाबत जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर यांना विशेषरित्या कळविणे बंधनकारक आहे.
प्रसारमाध्यमांचे (सर्व प्रकारचे दैनिकनियतकालिकेटीव्ही न्युज चॅनेल इ.) कार्यालय. अन्नऔषधीवैद्यकीय  उपकरणांची घरपोच सेवा देणाऱ्या ई-कॉमर्स सेवा उदा. अँमेझॉनफ्लीपकार्टबिग बास्केट इत्यादी सुरु राहील. किमान मनुष्यबळासह बँकाएटीएमकॅश लॉजिस्टीक आणि कॅश ट्रॉन्झकशन व अन्य संबधीत सेवा सुरू राहतील.
मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक्स माध्यमे. टेलीकॉमटपालइंटरनेटडेटासेवा यांसह माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सेवा. अत्यावश्यक वस्तुंची पुरवठा साखळी आणि वाहतूक. शेतमाल आणि अन्य वस्तूंची आयात-निर्यात आणि वाहतूक. बंदरावरुन होणारी वाहतुकमनुष्यबळकंटेनर फ्राईट स्टेशनचे कार्यान्वयनसाठवणूककस्टम हाऊस एक्स्चेंजची कार्यालयरेल्वेच्या अत्यावश्यक सेवा. खाद्य पदार्थऔषधे आणि वैद्यकीय उपकरणे यांसह अत्यावश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सव्दारे वितरण सुरू असणार आहे.
जीवनावश्यक दुकाने मर्यादीत वेळेसाठी सुरु :
            खाद्य पदार्थकिराणादुधदुग्धजन्य पदार्थ विक्री व वाहतुकब्रेडफळेभाजीपालाअंडीमांसमासेबेकरीपशु खाद्य यांची किरकोळ विक्री सकाळी 07.00 ते दुपारी 02.00 वाजेपर्यंतच सुरु राहील. खाद्य पदार्थकिराणादुधब्रेडफळेभाजीपालाअंडीमांसमासेयांची वाहतुक व साठवण.बेकरी आणि पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ आणि पशुवैद्यकीय सेवा. उपहारगृहांमधुन आणि खाजगीघरगुती खानावळ यांचकडून होणारी घरपोच सेवा. औषधी निर्मीतीडाळ व भात गिरणीइतर जिवनावश्यक अन्नपदार्थ निर्मीतीसाखरदुग्धजन्य पदार्थपशुखाद्यचारा निर्मीती घटक इत्यादी सुरू असतील.
अत्यावश्यक सेवा व संबंधित वाहतूक सुरु :
रुग्णालयेऔषधालयचष्माची दुकानेऔषधांचे दुकानेऔषधांचे कारखानेविक्रेते आणि वाहतुक.पेट्रोल पंपएलपीजी गॅसऑईल एजन्सीज त्यांची साठवण आणि त्यांच्याशी संबधित वाहतूक. टँकर्सव्दारे पाणी पुरवठा करणाऱ्या सेवा.पावसाळयापुर्वीची सर्व अत्यावश्यक कामे. अत्यावश्यक सेवांकरिता खासगी संस्थामार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था. अत्यावश्यक सेवांना किंवा कोरोना (कोविड-19) प्रतिबंधासाठी होणाऱ्या प्रयत्नांना मदत करणाऱ्या खासगी आस्थापना. सर्व प्रकारचे शितगृहेवखारगोदामा संबधीत सेवाघाऊक वितरणासाठी आणि वरील बाबींशी संबधीत पुरवठा साखळी सुरू असणार आहे.

कृषी संदर्भातील सेवावाहतूकशेतीविषयक कामे सुरु राहतील :
कृषी उत्पादन व किमान आधारभुत किंमत यांचेशी संबधीत कार्य करणारी कृषी उत्पन्न बाजार समिती वा राज्य शासनातर्फे अधिकृत असलेले मंडी,बाजार विशेषत: कापुसतुर व धान खरेदीविक्री आस्थापना,दुकाने. शेतकरी व शेतमजुर यांचे कडून करण्यात येणारी शेती विषयक कामे मासेमारी व मस्त्यव्यवसाय संबधी सर्व कामे व शेती विषयक औजारेयंत्र विक्री व दुरुस्ती संबधीत मान्यताप्राप्त दुकाने,आस्थापना (किमान मनुष्यबळासह). अनुसूचित क्षेत्र व बिगर अनुसूचित क्षेत्र, (एफआरए) क्षेत्र यातील गौण वनउत्पादने गोळा करणेप्रक्रिया करणेवाहतुक व विक्री आणि वन व वनेत्तर क्षेत्रातील तेंदुपत्ता संकलन केंद्रव गोदामापर्यंत त्याची वाहतुक.वनातील आगी रोखण्याकरीता जंगलात पडलेले लाकुड याची तात्पुरतीविक्री आगारापर्यंतची वाहतुक सुरू राहील.
शेती संबधीत यंत्रे,अवजारे चालविण्यासाठी आवश्यक असणारा मजुर वर्गकेंद्र (कस्टम हिअरींग सेंटर-सीएचसी).खतेकिटकनाशके व बियाणे यांचेशी निगडीत उत्पादन व पॅकजींग आणि किरकोळ विक्री संबधीत उद्योग,आस्थापना,दुकाने. आंतरराज्यीय सीमा प्रवासी वाहतुकीकरीता बंद असेल परंतुसर्व प्रकारची मालवाहतुकअत्यावश्यक मालवाहतुक नसली तरी परवानगी असेल.
राज्यांतर्गत,आंतरराज्यीय मालवाहतुक समयी ट्रक चालक व अतिरिक्त एक व्यक्ती वैध कागदपत्रासह मालवाहतुक अत्यावश्यक असली अथवा नसली तरी सुरु राहील. त्याकरिता वेगळा परवाना आवश्यक नाही. मालवाहतूक करुन खाली ट्रकाची वाहतुक सुध्दा यामध्ये समाविष्ठ राहील.
राज्यांतर्गत व आंतरराज्यीय कृषीफलोत्पादन संबधीत अवजारेयंत्रे जसे पेरणी,कापणी यांची वाहतुक. जिवनावश्यक वस्तु व सेवाअत्यावश्यक मालवाहतूक सेवा या बाबींशी संबधातील पुरवठा साखळी सुरळीत राखण्याकरिता आणि शासकीय वाहने,रुग्णवाहीकाट्रक इ. ची दुरुस्ती व देखभाल करण्याकरीताची गॅरेजवर्कशॉपस्पेअर पार्ट पुरवठादार यांची दुकानेआस्थापना (योग्य ती सुरक्षितता राखुन किमान मनुष्यबळासह) सुरू राहतील.
टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर व यांच्यासाठी काम करणारे सरकारीखाजगीकंत्राटी क्षेत्रातील अधिकारीकर्मचारी यांना टेलिकॉम सेवा सुरळीत सुरु राहावी. याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक क्षेत्र (कंन्टेनमेंट झोनहॉटस्पॉटसिलींग करण्यात आलेल्या इमारती व कॉम्प्लेक्सलॉकडाऊन) इ.क्षेत्रामध्ये असलेल्या टेलिकॉम सबधीत यंत्रणेची देखभाल व दुरुस्ती. ग्राम पंचायत स्तरावरील सरकार मान्य सीएससी सेंटर सुरू असणार आहे.
इलेक्ट्रीकल्स ट्रॉन्सफार्मर दुरुस्तीस्वयंरोजगार करणारे कामगारकारागीर जसे इलेक्ट्रीशियनसंगणक दुरुस्ती तंत्रज्ञप्लंबरमोटर मेकॅनिककारपेंटर यांची घरपोच सेवा.  कोळसा व खनिज उत्पादन वाहतुक व खनिकर्माकरीता आवश्यक स्पोटके व इतर सेवांचा पुरवठा व वाहतुक सुरू राहील.
लघु अथवा मध्यम स्वरुपातील अत्यावश्यक उद्योग सेवा जसे पिठाची गिरणीडाळ निर्मीतीखाद्य तेलाचे उत्पादन कारखाने. उपरोक्त वरील सर्व निर्बंध लोकांच्या वाहतुकीवर असेलवस्तुंच्या दळणवळणावर नाहीत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक वस्तु व सेवांचा पुरवठा करणाऱ्या संस्थासंबधीत कर्मचाऱ्यांसाठी असणाऱ्या वाहनांवर अत्यावश्यक सेवा असे ठळकपणे दिसणारे स्टिकर लावणे बंधनकारक असेल.
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
सदरचा आदेश संपुर्ण जिल्ह्यामध्ये 17 मे  2020 पर्यंत लागु असणार आहे.
00000

No comments:

Post a Comment