Search This Blog

Sunday, 30 November 2025

घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती


घुग्घुस नगर परिषदेच्या निवडणुकीला स्थगिती

गडचांदूरमूलबल्लारपूरवरोरा न.प. च्या काही सदस्य निवडणुकीला सुध्दा स्थगिती

चंद्रपूरदि. 30 : राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या पत्रान्वये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरभद्रावतीवरोराब्रम्हपुरीमूलघुग्घुसगडचांदूरचिमूरराजूरानागभीड या नगर परिषदांच्या व भिसी नगर पंचायतीच्या सदस्य व अध्यक्ष पदासाठी सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.

परंतु ज्या नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये ज्या जागेसाठी अपील दाखल होतेमात्र अपिलाचा निकाल संबंधित जिल्हा न्यायालयाकडून 22 नोव्हेंबर 2025 नंतर म्हणजेच 23 नोव्हेंबर 2025 किंवा त्यानंतर देण्यात आला आहेअशा नगर परिषदा व नगर पंचायतीच्या सदस्य पदाच्या त्या जागेच्या निवडणुका 4 नोव्हेंबर 2025 रोजीच्या निवडणूक कार्यक्रमानुसार घेण्यात येऊ नयेत. तसेच अशा प्रकरणात अध्यक्ष पदाचा समावेश असल्यास त्या संपूर्ण नगर परिषदेची निवडणूक स्थगित करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजी आदेशान्वये निर्देशित केले आहे.

त्या अनुषंगाने घुग्गुस  नगर परिषदेचे अध्यक्षपद व सात सदस्य जागा तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 - ब (सर्वसाधारण महिला)मूल न.प.ची जागा क्र. 10 -  ब (सर्वसाधारण)बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या निवडणुका संदर्भात महाराष्ट्र नगरपालिका निवडणूक नियम 1966 च्या नियम 17 (1)(ब) नुसार कार्यवाही न झाल्याने घुगुस नगर परिषदेचा संपूर्ण निवडणूक कार्यक्रम तसेच गडचांदूर न.प. ची जागा क्र. 8 - ब (सर्वसाधारण महिला)मूल न.प.ची जागा क्र. 10 -  ब (सर्वसाधारण)बल्लारपूर न.प. ची जागा क्र. 9 – अ (ना.मा. प्र.) आणि वरोरा नगर परिषदेची जागा क्र. 7 – ब (सर्वसाधारण) या जागेकरीता सदस्य पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रमाला सुध्दा स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने 29 नोव्हेंबर 2025 रोजीच्या आदेशानुसार घुग्घुस नगर परिषदेचा तर गडचांदूरमूलबल्लारपूर आणि वरोरा येथील वरील नमुद सदस्य निवडणुकीचा सुधारीत कार्यक्रम जाहीर केला असल्याचे जिल्हा निवडणूक कार्यालयाने कळविले आहे.

००००००

Saturday, 29 November 2025

मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा 2-3 तासांची सवलत देण्याचे आदेश


मतदानाच्या दिवशी कामगारांना भरपगारी सुट्टी अथवा 2-3 तासांची सवलत देण्याचे आदेश

चंद्रपूरदि. 29 : राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये मतदान करण्याकरीता चंद्रपुर जिल्हयात काम करणा-या कामगार मतदारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी अथवा 2 ते 2 तासाची सवलत देण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाचे उद्योगउर्जाकामगार व खनिकर्म विभागाच्या शासन निर्णयान्वये सर्व दुकानेआस्थापनाव्यापारी संस्थाहॉटेलरेस्टारेन्टनाट्यगृहेऔद्योगिक उपक्रमकारखाने किंवा इतर व्यापारी आस्थापनांमध्ये कार्यरत असलेल्या कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्याकरीता मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाईल. सदर सुट्टी उद्योगऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनाकारखानेदुकाने आदींना लागू राहील, (खाजगी कंपन्या मधील आस्थापनासर्व दुकाने व इतर आस्थापनानिवासी हॉटेलखाद्यगृहेअन्नगृहेनाट्यगृहेव्यापारऔद्योगिक उपक्रमकिंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्याशॉपिंग सेंटरमॉल्सरिटेलर्स इत्यादी.)

अपवादात्मक परिस्थितीत अनुपस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होईलअशा धोकादायक अथवा लोकोपयोगी सेवेत अथवा आस्थापनांच्या संदर्भात अधिकारीकर्मचारी व कामगार आदींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तरमतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी 2 ते 3 तासांची सवलत मिळेल. याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील.

वर नमूद केल्यानुसार आस्थापनांच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. मतदारांकडून मतदानाकरीता योग्य ती सुट्टी  अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता आले नाहीअशी तक्रार आल्यासत्यांच्याविरुध्द योग्य कारवाई करण्यात येईलयाची नोंद घेण्यात यावी. या संदर्भात कामगारांनी आपली तक्रार सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालयनवीन प्रशासकीय इमारतबस स्टॅन्ड समोरचंद्रपुर येथे स्थापित केलेल्या नियंत्रण कक्षात प्रत्यक्षात किंवा  ई-मेल द्वारे assttcommrchd @gmail.com तक्रार करावीअसे कामगार विभागाने कळविले आहे.

००००००

निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तीन दिवस मद्यविक्री बंद


निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तीन दिवस मद्यविक्री बंद

चंद्रपूरदि. 29 : चंद्रपूर जिल्ह्यात 10 नगर परिषद आणि 1 नगर पंचायत क्षेत्रात सार्वत्रिक निवडणूक होत असून 2 डिसेंबर रोजी मतदान आणि 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने खुल्यामुक्त व निर्भय वातावरणात सदर निवडणुका पार पाडण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निवडणूक असलेल्या क्षेत्रात सलग तीन दिवस म्हणजे 12 व 3 डिसेंबर 2025 रोजी मद्य / बिअर / ताडी विक्री बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूरभद्रावतीवरोराब्रम्हपुरीमूलराजूराघुग्घुसगडचांदूरनागभीडचिमूर या नगर परिषदेत तर भिसी येथील नगर पंचायतीमध्ये निवडणूक होत आहे. त्या अनुषंगाने मतदानाच्या पुर्वीचा दिवस म्हणजे 1 डिसेंबरमतदानाचा दिवस 2 डिसेंबर आणि मतमोजणीचा दिवस 3 डिसेंबरहे तिनही संपूर्ण दिवस मद्य / बिअर / ताडी विक्री बंद ठेवण्यात येईल. या आदेशाचा व नियमावलीतील तरतुदींचा भंग करणा-या अनुज्ञप्तीधारकांविरुध्द कडक कारवाई करण्यात येईलअसे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या आदेशात नमुद आहे.

००००००

कोलारी येथील जि.प. शाळेत ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम




 

कोलारी येथील जि.प. शाळेत ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम

गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या शहिदी समागम वर्षानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

चंद्रपूरदि. 29 : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत ‘हिंद-की-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त राज्यभर विविध शैक्षणिक आणि जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. या संदर्भातील शासन निर्णयाच्या अनुषंगाने शिक्षण विभागाने सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकजिल्हा परिषद शिक्षणाधिकारीनगरपालिका/महानगरपालिका शिक्षण विभाग तसेच सर्व शाळा-महाविद्यालयांना आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

शालेय विद्यार्थ्यांना धर्मस्वातंत्र्यमानवी मूल्येसहिष्णुतादेशहितासाठीचा त्यागही गुरू तेग बहादूर साहिब जी यांनी दिलेली प्रेरणा समजावून सांगणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. श्री गुरु तेग बहादूर साहेब जी 350 वी  शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त पंचायत समिती चिमूर अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाकोलारी येथे ‘हिंद दी चादर’ कार्यक्रम घेण्यात आला.

शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे (केळकर) यांच्या सूचनेनुसारचिमूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विशाल बोधाने यांच्या  मार्गदर्शनात व शिक्षण विस्तार अधिकारी स्वप्निल खांडेकर यांच्या संकल्पनेतून  शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुरु तेग बहादूर यांचे छायाचित्रगुरुपरंपरेवर आधारित चित्रकला स्पर्धाकविता गायन स्पर्धा व प्रार्थना घेण्यात आली. हे सर्व उपक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी  शाळेच्या मुख्याध्यापिका वनश्री चौधरीसहाय्यक शिक्षिका संध्या गोंडानेसहाय्यक शिक्षक आशिष उपासे तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी सहकार्य केले.

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये पुढील उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यात 1. गुरू तेग बहादूर साहिब जी यांच्या जीवनकार्य व बलिदानावर विशेष प्रबोधन सत्र2. निबंधचित्रकलावक्तृत्वप्रश्नमंजुषा इत्यादी स्पर्धा3. वाचन प्रेरणा उपक्रमग्रंथ प्रदर्शने व माहितीपर साहित्याचे वाचन4.धर्मनिरपेक्षतामानवताबंधुता आणि राष्ट्रीय एकात्मता यांवरील व्याख्यानमाला5. शालेय सभांमध्ये माहितीपर कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन याचा समावेश आहे.

००००००

शासकीय हमीभावने धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी

 शासकीय हमीभावने धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी

चंद्रपूरदि. 29 :  हंगाम 2025-26 मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समितीचंद्रपुर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे. धान प्रति क्विंटल 2369 रुपये असून शासनाने दिलेल्या निकषानुसार एफ.ए.क्यु. दर्जाचा शेतमाल खरेदी केला जाईल.

सदर धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. शासनाच्या पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून बायोमेट्रिक पध्दतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना नोंदणी साठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. चंद्रपुर व बल्लारपुर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार कार्डबँक पासबुक7/12 उतारा व मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करून घ्यावी व शासकिय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर कडून करण्यात येत आहे.

००००००

उदापूर येथे अवैध दारूसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा 5 लक्ष 16 हजारांचा मुद्देमाल जप्त


उदापूर येथे अवैध दारूसाठ्यावर उत्पादन शुल्क विभागाचा छापा

5 लक्ष 16 हजारांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूरदि. २९ : नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार दिनांक 01 ते 03 डिसेंबर 2025 या कालावधीत दारूबंदी लागू असताना उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. विभागीय उपायुक्त राज्य उत्पादन शुल्क नागपूर विभागाचे गणेश पाटील व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क चंद्रपूर नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. 

गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून मौजा उदापूरतालुका ब्रह्मपुरी येथील ज्ञानेश्वर रामकृष्ण नाकतोडे या व्यक्तीने अवैधरित्या देशी व विदेशी दारूचा मोठ्या प्रमाणात साठा करून ठेवल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास भरारी पथकाने आरोपीच्या घरी छापा टाकला असता मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा आढळून आला.

छापामारीत दोन लिटर क्षमतेच्या विदेशी दारूच्या 11 बाटल्या180 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या 1927 बाटल्या90 मिली क्षमतेच्या विदेशी दारूच्या 225 बाटल्या90 मिली क्षमतेच्या देशी दारूच्या 200 बाटल्या. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 5 लक्ष 16 हजार 280 रुपये इतकी आहे.

ही कारवाई दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे यांच्या नेतृत्वाखाली जवान सुजित चिकाटेसंजय कुमार हरिणखेडे आणि सुकेशनी कारेकार यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सोमेश्वर गव्हारे करीत आहेत.

००००००

Friday, 28 November 2025

नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी केंद्रांभोवती निर्बंध – जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश

 नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान व मतमोजणी केंद्रांभोवती निर्बंध – जिल्हादंडाधिकाऱ्यांचा आदेश

चंद्रपूरदि. 28 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरराजुरागडचांदूरभद्रावतीवरोराचिमूरब्रम्हपुरीनागभीडमुलघुग्गुस या नगरपालिकांमध्ये तसेच भिसी नगरपंचायतीत सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी आचारसंहिता 4 नोव्हेंबर 2025 पासून लागू करण्यात आली आहे.

दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30  वाजेपर्यंत मतदान होणार असूनमतमोजणी दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता सुरू होईल. या अनुशंगाने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि आदर्श आचारसंहितेचे पालन सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता2023 चे कलम 163 नुसार जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विशेष निर्बंध लागू करण्याचा आदेश जारी केला आहे.

1 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 पासून ते मतमोजणी पूर्ण होईपर्यंत खालील निर्बंध लागू मतदान व मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात :

* अनधिकृत जमावसार्वजनिक सभावाहनांची वर्दळ बंदी

* भित्तीपत्रकेध्वजचिन्हेप्रचार साहित्य यांवर बंदी

* मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहने वापरण्यास मनाई

* मोबाईलवायरलेस सेट इत्यादी मतदान केंद्रात नेण्यास बंदी (अधिकृत कर्मचारी वगळता)

* धोक्यातील व्यक्तींना सुरक्षा दलासह 100 मीटर परिसरात येण्यास निर्बंध

* मतमोजणी केंद्राबाहेरील 100 मीटर परिसरातील दुकानेआस्थापना बंद

* मतमोजणी केंद्राच्या परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेशबंदी

* ड्रोन उडविण्यास सक्त मनाई

प्रतिबंधातून सूट

डोअर टू डोअर प्रचार (5 पेक्षा जास्त व्यक्ती जमण्यास मनाई)

* अँबुलन्सदवाखान्याच्या गाड्यादूधगाड्यापाणी टँकरपोलिसवीजनिवडणूक कर्मचारी यांची वाहने

* बसस्थानकरेल्वे स्थानक किंवा हॉस्पिटलकडे जाणारी वाहने

* दिव्यांग/आजारी मतदारांना त्यांच्या वैयक्तिक वाहनाने मतदानासाठी ये-जा

जिल्हादंडाधिकाऱ्यांचे हे आदेश दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी सही व कोर्टाच्या शिक्क्यासह जारी करण्यात आले असूनसंबंधित पोलीस अधिकाऱ्यांना आदेशाचे व्यापक प्रसारण करण्याचे निर्देश दिले आहेत.

००००००

चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश


चंद्रपूर जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकीदरम्यान आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश

चंद्रपूरदि. 28 : राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक-2025 च्या कार्यक्रमानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरराजुरागडचांदूरभद्रावतीवरोराचिमूरब्रम्हपुरीनागभीडमुलघुग्गुस या नगरपालिकांसाठी तसेच भिसी नगरपंचायतीसाठी दि. 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर दि. 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून मतमोजणी पार पडणार आहे. 4 नोव्हेंबर 2025 पासून या निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू आहे.

मतदान व मतमोजणीच्या दिवशी संबंधित नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रात भरत असलेल्या आठवडी बाजारांमध्ये मोठी गर्दी होत असल्याने आदर्श आचारसंहितेचे पालनकायदा-सुव्यवस्था आणि निवडणूक प्रक्रिया निर्विघ्न पार पाडण्यासाठी बाजार बंद ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हादंडाधिकारी यांनी नमूद केले आहे.

मार्केट अ‍ॅण्ड फेअर अ‍ॅक्ट1862 चे कलम 5(अ) अन्वये जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.  यांनी मतदान दिवशी (दि. 2 डिसेंबर 2025 – मंगळवार) गडचांदूर येथे आठवडी बाजार येत असल्याने सदर आठवडी बंद ठेवण्यात येणार असून मतमोजणी दिवशी (दि. 3 डिसेंबर 2025 – बुधवार) भद्रावती व मूल येथील आठवडी बाजार बंद ठेवण्यात येणार आहे.

हा आदेश दि. 27 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या  स्वाक्षरीसह जारी करण्यात आला असूनसर्व संबंधितांनी आदेशाचे काटेकोर पालन करावेअसे आवाहन करण्यात आले आहे.

००००००

Thursday, 27 November 2025

मृत झालेल्या कुटुंबियाच्या पात्र वारसदाराला शासकीय नोकरी


मृत झालेल्या कुटुंबियाच्या पात्र वारसदाराला शासकीय नोकरी

Ø ॲक्ट्रोसिटी कायद्यांतर्गत शासन निर्णय जारी, 1 डिसेंबर रोजी कार्यशाळा

चंद्रपूरदि. 27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय 20 नोव्हेंबर 2025 अन्वये अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधअधिनियमांतर्गत दाखल खून किंवा अत्याचाराच्या अनुषंगाने झालेल्या मृत्यूच्या प्रकरणातील दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबातील एका पात्र वारसास गट-क व गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय पदावर शैक्षणिक अर्हतेनुसार नियुक्ती देण्यास शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे

त्यानुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती (अत्याचार प्रतिबंधअधिनियमांतर्गत खुन प्रकरणामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना गट-क य गट-ड संवर्गातील शासकीय/निमशासकीय पदावर शैक्षणिक अहतेनुसार नियुक्ती देण्यासंदर्भात डिसेंबर 2025 रोजी दुपारी वाजता सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणसामाजिक न्याय भवनचंद्रपूर  या कार्यालयात कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहेसदर प्रकरणातील वारसांनी नियोजित कार्यशाळेला उपस्थित राहूनअर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक आयुक्तविनोद मोहतुरे यांनी केले  आहे.

००००००

इरई नदीच्या पूरबाधित क्षेत्राची पाहणी व आखणी

 इरई नदीच्या पूरबाधित क्षेत्राची पाहणी व आखणी

Ø पाटबंधारे विभागाच्या फिरते पथकाला माहिती देण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 27 : इरई नदीलगत चंद्रपूर परिसरातील गावांमध्ये पूर बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी व आखणीचे काम चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार आहेयात कढोलीचिंचोलीवढोलीपायलीकिटाळीमिनगांवचांदसुर्लालोहनविचोडाअंबोराविचोडी  बु., नेरीपडोलीलखमापूरवडगांवचांदा रैकोसरारहमत नगरबालाजी वार्डनगिनाबागसिस्टर कॉलोनीजगन्नाथ बाबा नगरचंद्रपूरदाताळादेवाडाबोररिठआरवटचारवटनांदगाव पोडेहडस्ती गावे व वस्तींचा समावेश आहे.

            1 ते डिसेंबर 2025 या कालावधीत विभागाचे फिरते पथक नदीकाठच्या भागात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधेल व पूरस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती गोळा करेलनागरिकांनी सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी,  असे कार्यकारी अभियंताचंद्रपूर पाटबंधारे विभागाने कळविले आहे.

००००००


Wednesday, 26 November 2025

जिल्हाधिका-यांकडून घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी

 





जिल्हाधिका-यांकडून घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी

चंद्रपूर, दि. 26 : नगर परिषद / नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 26) घुग्गुस आणि भद्रावती येथील मतदान केंद्राची पाहणी करून सुचना दिल्या.

जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी नगर परिषद, घुगुस येथील ईव्हीएम मशीन ठेवायचा सुरक्षा कक्ष व जनता विद्यालय घुगुस येथील आठ मतदान केंद्राची पाहणी केली. मतदान केंद्रावर स्वयसेवकांची नेमणूक, आवश्यक त्या सोयीसुविधा तसेच मतदान पथकांना जास्तीत जास्त व अचूक प्रशिक्षण देण्यासंबंधी सूचना केल्या.

यावेळी चंद्रपुरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, घुग्गुस न.. चे निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रपुरचे तहसीलदार चंद्रपूर विजय पवार, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी निलेश रांजणकर व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नायब तहसीलदार ओंकार ठाकरे आदी उपस्थित होते.

            भद्रावती येथे जिल्हाधिका-यांची भेट : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भद्रावती नगर परिषद निवडणूक तयारीचा आढावा घेतला. या अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथील स्ट्राँग रुमला भेट दिली तसेच मतमोजणी कक्षाची देखील पाहणी केली व आवश्यक सूचना केल्यात. निवडणुकीची पुढील  प्रक्रिया साहित्य वाटप, मतमोजणी प्रकिया ही शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावती येथे होणार आहेत.

जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी  प्रभाग 11 चे मतदान केंद्र जिल्हा परिषद हायस्कूल, भद्रावती तसेच यशवंतराव शिंदे (प्रभाग 7) येथील मतदान केंद्रांना भेट दिली.  या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी अतूल जटाले, भद्रावतीचे तहसीलदार बालाजी  कदम,  .. मुख्याधिकारी विशाखा शेळकी, पोलिस निरीक्षक योगेश पारधी, नायब तहसीलदार श्री. काळे, समीर वाटेकर, राकेश महकुलकर, राजू काळे इत्यादी उपस्थित होते. भद्रावती नगर परिषद क्षेत्रातील एकूण मतदारांची संख्या 52572 असून स्त्री मतदार 26557, पुरुष मतदार 26015 आहेत. एकूण मतदार केंद्राची संख्या 63 आहे.

०००००

चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम

 


चाईल्ड हेल्पलाईन 1098 सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम

चंद्रपूर, दि. 26 : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी बचाओ बेटी पढाओव बालविवाह प्रतिबंध अभियान अंतर्गत चांदा पब्लिक स्कूल येथे चाईल्ड हेल्पलाईन 1098 व सखी वन स्टॉप सेंटर 181 बाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून चांदा पब्लिक स्कूलच्या प्राचार्य आम्रपाली पडोळे, तर प्रमुख अतिथी म्हणून परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर व चांदा पब्लिक स्कूलचे सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थी विद्यार्थिनी ही उपस्थित होते.

याप्रसंगी अभिषेक मोहुर्ले यांनी युट्युबवर असलेली गुड टच व बॅड टच स्टोरी विद्यार्थ्यांना दाखविली. यावेळी ते म्हणाले, आजचे बालक सुरक्षित असले पाहिजे. बालकांना कुठेही शारिरीक, मानसिक सामाजिक समस्या येत असेल अशावेळी चाईल्ड हेल्पलाईन 1098 ही यंत्रणा बालकांचे संरक्षण करण्याचे कार्य करित असते. बालकांनी फ्रेंड्स बनविले पाहिजेत, आपल्या भावना शेअर केल्या पाहिजेत, परंतु बार्डर लाईन कधीही क्रॉस करू नये. आपल्या ध्येयापासून विचलित होऊ नये. सोशल मिडियाचा वापर जपून करावा, अथवा करू नये.

मार्गदर्शन करतांना सखी वन स्टॉप सेंटरच्या राणी खडसे यांनी बालकांशी हितगुज करित सखी वन स्टॉप सेंटर व महिला हेल्पलाईन 181 कार्याबाबत बालकांना माहिती दिली.  सदर कार्यक्रमाचे आयोजन चांदा पब्लिक स्कूल चंद्रपूरद्वारे करण्यात आले, यावेळी कार्यक्रम आयोजनाचे प्रभारी म्हणून फहिम शेख आणि रूहिना तबस्सूम यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाचे संचालन श्रावणी चिकटे व अंतरा पारखी या विद्यार्थ्यांनी केले तर आभार तनिष्का बुरण या विद्यार्थीनीने मानले.

०००००००

विशेष लेख : श्री गुरु तेग बहादुर – 'हिंद दी चादर'

 

विशेष लेख                                                                                                                       दि.26/11/2025

श्री गुरु तेग बहादुर – 'हिंद दी चादर'

चंद्रपूर, दि. 26 : श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना 'हिंद दी चादर' या नावाने गौरविले जात. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे.

श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा, यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या 350 व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिब जी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

एप्रिल 1621 मध्ये अमृतसरमध्ये श्री गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील गुरु हरगोबिंद आणि माता  नानकी देवी  यांच्या कुटुंबात झाला. 1664 मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती. गुरु तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजेच तलवारीसारखा धैर्यवान हे नाव दिले. ते अतिशय शांत, ध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य, संपत्ती. मान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केले.

धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील चांदनी चौकातील तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करत, ईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले. मानवधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना गुरू तेग बहादुर शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मुल्यांचा संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आनंदपूर साहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. जे आजही शीख धर्मातील अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने 2022 मध्ये त्यांची 400 वी जयंती देशभर साजरी केली होती

त्यांनी देशाला साधे आणि गहन तत्वज्ञान दिले व सुमारे 57 शबद (भक्तिगीते) आणि 57 सलोक (उपदेशपर पदे) रचले. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या भागात आहेत.

'जो नर दुःख में दुःख नहीं मानें,

सुख सनेहु अरू भय नहीं जा कै, कांचन माटी मानै,

लोभ मोह अभिमान न ता कै, हरख सोग नहीं जा कै

जो नर दुःख में दुःख नहीं मानै'

म्हणजेच जो मनुष्य दुःखात असला तरी दुःखी होत नाही, जो सुखात असला तरी अहंकार करत नाही, ज्याच्यासाठी सोने आणि माती समान आहेत, जो लोभ, मोह, अभिमान, आनंद आणि शोक यांपासून मुक्त आहे तोच खरा ज्ञानी आहे. अशा अनेक भावपूर्ण आणि मानवी जीवनाचा सार सांगणाऱ्या रचना त्यांनी केल्या आहेत.

त्यांच्या शहिद समागमास 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अल्पसंख्यांक विभाग आणि श्री गुरू तेग बहादुर साहिब जी 350 शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नुकत्याच या कार्यक्रमांच्या आयोजनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी 'हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब यांच्या 350 व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यशाळेनिमित्त शीख, सिकलिगर, बंजारा, लबाना, मोडियाल, सिंधी हे सहा समाज एकत्र आले होते आणि हा कार्यक्रम जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती आणि शासन एकत्रितरित्या काम करीत आहे. त्यांच्या बलिदानाचा इतिहास राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, तहसील, शहर, जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात गुरू तेग बहादुरांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.

                                                                                                            श्रध्दा मेश्राम

विभागीय संपर्क अधिकारी, मुंबई

०००००