Search This Blog

Friday, 21 November 2025

सरदार @ 150 जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा





 सरदार 150 जिल्हास्तरीय युनिटी पदयात्रा

चंद्रपूरदि. 21 : जिल्हा प्रशासन आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयभारत सरकार यांच्या मेरा युवा भारतचंद्रपूर तर्फे सरदार 150 जिल्हास्तरीय युनिटी/पदयात्रेचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालयचंद्रपूर येथे करण्यात आले. कार्यक्रमाचा शुभारंभ प्रा. डॉ. गुरुदास बाल्कीएन.एस.एस. जिल्हा समन्वयक यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला.

कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. प्रमोद  काटकरउपप्राचार्य प्रा. डॉ. माध्यमशेट्टीवारजिल्हा युवा अधिकारीमेरा युवा भारत सुशिल भडकॅप्टन डॉ. सतिश कन्नाकेप्रा. डॉ. कुलदीप गोंडएन.एस.एस. समन्वयक,  मोरेश्वर गायकवाडक्रीडा अधिकारीसमन्वयक मंगेश डुबे उपस्थित होते.

उद्घाटन प्रा. डॉ. बाल्की यांनी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे भारत एकीकरणातील कार्य स्मरण करून युवकांना राष्ट्रीय एकताविकास आणि सेवा यांचा संदेश दिला. पदयात्रेच्या प्रारंभी प्राचार्य प्रा. डॉ. काटकर यांच्या हस्ते राष्ट्रीय एकता दिवस शपथआत्मनिर्भर भारत संकल्प आणि नशामुक्ती प्रतिज्ञा उपस्थित युवक-युवतींना देण्यात आली. कार्यक्रमात देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमपथनाट्य यांचेही आयोजन करण्यात आले.  या पदयात्रेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या 500 युवक-युवतींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सुशिल भड यांनी केले. संचालन डॉ. पुरुषोत्तम माहुरे यांनी तर आभार  प्रा. डॉ. कुलदीप गोंड यांनी मानले. पदयात्रा यशस्वी करण्यासाठी सोहेलयश आसुटकरमारोती बोबाटेखोमेश भड व मंगेश भट यांनी मेहनत घेतली.

0000000

No comments:

Post a Comment