Search This Blog

Monday, 24 November 2025

कुष्ठरोग शोध मोहीम अभियानचा सीईओंकडून आढावा


कुष्ठरोग शोध मोहीम अभियानचा सीईओंकडून आढावा

चंद्रपूरदि. 24 :  राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत कुष्ठरुग्ण शोध अभियान 17 नोव्हेंबर  ते डिसेंबर 2025 या कालावधीत राबविण्यात येत आहेत्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा पार पडली व आतापर्यंत झालेल्या मोहिमेच्या कार्याचा आढावा घेण्यात आला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारेजिल्हा शल्य चिकित्सक डॉमहादेव चिंचोळेअतिजिल्हा आरोग्य अधिकारी डॉअविष्कार खंडाळेसहाय्यक संचालक (कुष्ठरोगडॉसंदिप गेडामजिल्हा क्षयरोग अधिकारी डॉललीत पटलेनिवासी वैद्यकिय अधिकारी डॉहेमचंद कन्नाकेजिल्हा हिवताप अधिकारी डॉप्रकाश साठे व इतर अधिकारी उपस्थित होते.

            सदर मोहिमेत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमाविषयी  यावेळी माहिती देण्यात आलीयात मोहिमेचा उद्देशसमाजात लपुन राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर व विनाविकृती शोधून काढणेत्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच नविन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे व समाजात कुष्ठरोगाविषयी जनजागृती करणे.  कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून सन 2027 पर्यंत शुन्य कुष्ठरोग प्रसाराचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने वाटचाल करणे.

कुष्ठरोगाची लक्षणे : त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा त्या ठिकाणी घाम न येणेजाडबधीर तेलकट/चकाकणारी त्वचात्वचेवर गांठी असणेकानाच्या पाळया जाड होणेभुवयांचे केस विरळ होणेडोळे पुर्ण बंद करता न येणेतळहातावर व तळपायावर मुंग्या येणेबधीरपणा अथवा जखमा असणेहाताची व पायाची बोटे वाकडी असणेहात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणेत्वचेवर थंड व गरम संवेदना न जाणवणे,

हात व पायांमध्ये अशक्तपणा जाणवणेहातातुन वस्तु गळून पडणे इत्यादी

               जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा स्वयंसेविकापुरुष स्वयंसेवक व आरोग्य कर्मचारी यांच्यामार्फत सर्व कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची कुष्ठरोग विषयक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेतद्नंतर संशयित कुष्ठरुग्णांची तपासणी करून प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी यांचे मार्फत निदान करण्यात येणार आहे. 20 नोव्हेंबरपर्यंत 6 लक्ष 12 हजार 63 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.           

सदर कार्यक्रम हा जनतेच्या हिताचा असून यामध्ये आरोग्य कर्मचा-यामार्फत घरोघरी जाऊन आरोग्य शिक्षण व जनजागृती करण्यात येणार आहेकरीता सर्व जनतेने येणा-या कर्मचा-यांमार्फत आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावीअसे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौड़ा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह सरप्रभारी मनपा आयुक्त डॉविद्या गायकवाड,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉअशोक कटारेजिल्हा शल्यचिकीत्सक डॉमहादेव चिंचोळेसहाय्यक संचालक (कुष्ठरोगडॉसंदीप गेडाम यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment