Search This Blog

Tuesday, 18 November 2025

‘युथ फॉर जॉब’ च्या प्रशिक्षणामुळे दिव्यांग तरुणीला मिळाला रोजगार


 युथ फॉर जॉब’ च्या प्रशिक्षणामुळे दिव्यांग तरुणीला मिळाला रोजगार

Ø दृष्टीदोषावर मात करून प्रकाशाकडे वाटचाल

चंद्रपूरदि. 18 : ‘युथ फॉर जॉब’ ही संस्था दिव्यांग व्यक्तिचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी काम करणारी दक्षिण आशियातील सर्वात मोठी संस्था आहेराज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग युवक – युवतीच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘युथ फॉर जॉब’ या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन मॉडेल उभारण्याची संकल्पना मांडली आहेया संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगारक्षम करणेयुडीआयडी (स्वावलंबन कार्डकरीता दिव्यांगांची 100 टक्के नोंदणीलक्षित कौशल्य विकास आणि दिव्यांग व्यक्तिंसाठी शाश्वत उपजिविका निर्माण करणेहा मुख्य उद्देश असून त्याचा फायदा दिव्यांग नागरिकांना होत आहेअशाच प्रशिक्षणामुळे सावंगा विठोबा (ताचंद्रपूरयेथील राजश्री पुरुषोत्तम खोडके (वय 30) या दिव्यांग तरुणीचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे झाला असून ती आज आर्थिक स्वावलंबी झाली आहे.

राजश्री ही 40 टक्के अंशतअंध (दिव्यांगअसून तीने वस्त्र विज्ञान (बॅचरल ऑफ टेक्साईल सायन्समध्ये शिक्षण घेतले आहे.  राजश्रीच्या कुटुंबात आई –वडीलएक धाकटा भाऊ आणि तिला तीन मोठ्या बहिणी आहेतवडील पुरुषोत्तम खोडके पूर्वी बल्लारपूर येथील पेपर मिलमध्ये काम करत होते आणि आता निवृत झाले आहेततर आई गृहिणी आहेतराजश्रीचा जन्म अमरावती येथे झालापरंतु वडिलाच्या नोकरीमुळे कुटुंब बल्लारपूर येथे स्थलांतरित झाले.              

           लहाणपणीच राजश्रीला त्वचाविकारामुळे दृष्टिदोष  झालाज्यामुळे तिची दृष्टी मोठ्या प्रमाणात कमी झाली.  या परिस्थितीमुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण काळात तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागलाशैक्षणिक मर्यादांसह सामाजिक परिणामाला सुध्दा तिला सामोरे जावे लागलेमात्र अतिशय आत्मविश्वासाने तिने वस्त्र विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केल्यांनतर रोजगाराच्या संधी शोधायला सुरवात केलीपरंतु योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक कौशल्यांच्या अभावामुळे नोकरी मिळवणे कठीण गेले.

जेव्हा तिला ‘युथ फॉर जॉब’ बद्दल मित्र महेश मेश्राम यांनी माहिती दिलीतेव्हापासून तिच्या आयुष्यात निर्णायक क्षण आलाराजश्रीने आत्मविश्वासाने एक महिन्याच्या कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेतला आणि स्वत:ला सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दृढ निश्चय केलाप्रशिक्षणादरम्यान राजश्रीने सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलातसेच आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिलेमदत केली आणि नेतृत्वाचे गुण दाखवलेप्रशिक्षणादरम्यान संवादकौशल्यवेळेचे व्यवस्थापनसमस्या सोडवण्याचे तंत्रकार्यस्थळी  शिष्टाचार आणि मुलाखत तयारी यासारखी महत्वाची कौशल्ये तिने आत्मसात केलीया कौशल्यांनी तिचा आत्मविश्वास आणि रोजगारक्षमता वाढण्यास मदत झाली.

            प्रशिक्षणानंतर राजश्रीने भूपेंद्र गौड टीएम पोषणतज्ज्ञ यांच्याकडे मुलाखत दिली आणि ग्राहक सहाय्यक (कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटीव्हया पदासाठी  तिची निवड  झालीआता ती वार्षिक 1 लक्ष 80 हजार रुपये   इतके  स्थिर उत्पन्न कमवत आहेज्यामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले आहेआज राजश्री आत्मविश्वासाने आपली  जबाबदारी पार पाडत असून सहकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधतेएकेकाळी ज्या कमी दृष्टिक्षमतेमुळे ती आत्मविश्वास गमावून बसली होतीत्या बाबींवर यशस्वीरित्या मात करत ‘युथ फॉर जॉब’ च्या प्रशिक्षणामुळे ती आज पुन्हा आत्मविश्वासाने उभी आहे.

०००००००

No comments:

Post a Comment