गृहपयोगी वस्तु वाटप संचाकरीता बांधकाम कामगारांनी नोंदणी करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि, 04 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिवीत सक्रीय बांधकाम कामगारांना गृह उपयोगी वस्तु संच वाटप हे प्लॉट नं. १-४, एम.आय.डी.सी. चंद्रपूर इंडस्ट्रिअल एरिया, चंद्रपूर येथे सुरू आहे. तरी बांधकाम कामगाराने ऑनलाईन पध्दतीने https:/hikit://mahabocw.in/
सदरील योजना ही नि:शुल्क असल्याने कोणाही व्यक्तीस /एजंट यांना पैसे देऊ नये तसेच पैसे / लाचेची मागणी करणाऱ्या संबंधितांवार फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त कार्यालय यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
००००००
No comments:
Post a Comment