इरई नदीच्या पूरबाधित क्षेत्राची पाहणी व आखणी
Ø पाटबंधारे विभागाच्या फिरते पथकाला माहिती देण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 27 : इरई नदीलगत चंद्रपूर परिसरातील गावांमध्ये पूर बाधित क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी व आखणीचे काम चंद्रपूर पाटबंधारे विभागामार्फत करण्यात येणार आहे. यात कढोली, चिंचोली. वढोली, पायली, किटाळी, मिनगांव, चांदसुर्ला, लोहनविचोडा, अंबोरा, विचोडी बु., नेरी, पडोली, लखमापूर, वडगांव, चांदा रै. कोसरा, रहमत नगर, बालाजी वार्ड, नगिनाबाग, सिस्टर कॉलोनी, जगन्नाथ बाबा नगर, चंद्रपूर, दाताळा, देवाडा, बोररिठ, आरवट, चारवट, नांदगाव पोडे, हडस्ती गावे व वस्तींचा समावेश आहे.
1 ते 7 डिसेंबर 2025 या कालावधीत विभागाचे फिरते पथक नदीकाठच्या भागात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधेल व पूरस्थितीबाबत प्रत्यक्ष माहिती गोळा करेल. नागरिकांनी सहकार्य करून वस्तुनिष्ठ माहिती उपलब्ध करून द्यावी, असे कार्यकारी अभियंता, चंद्रपूर पाटबंधारे विभागाने कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment