14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत अखिल भारतीय सहकार सप्ताह
चंद्रपूर, दि. 11 : भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ, नवी दिल्ली दरवर्षी अखिल भारतीय सहकार सप्ताह 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत देशात आयोजित करीत असते. यावर्षी सुध्दा आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष 2025 च्या निमित्ताने 72 वा अखिल भारतीय सहकारी सप्ताह साजरा करण्यात येत असून महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्यावतीने राज्यात व जिल्ह्यात सहकारी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वर्षीच्या सह.सप्ताहाची मुख्य संकल्पना ‘आत्मनिर्भर भारतासाठी सहकारी संस्था हे माध्यम’ ही आहे.
सर्व सहकारी संस्थांनी आपल्या स्तरावर सदर सहकारी सप्ताहात पदाधिकाऱ्यांना, सभासदांना अवगत करून सहकारी सप्ताहात खालील दिन विशेषानूसार सभासद शिक्षण प्रशिक्षण कार्यकम, सहकारी ध्वजारोहण, वृक्षलागवड व परिसर स्वच्छता असे लोकाभिमुख कार्यक्रम राबवावे. सदर उपक्रम राबवितांना आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काटेकोर दक्षता घ्यावी.
14 नोव्हेंबर रोजी सहकारी संस्थामध्ये कार्यात्मक कार्यक्षमता जबाबदारी आणि पारदर्शकता वाढविण्यासाठी डिजिटलायझेशनचा वापर करणे, 15 नोव्हेंबर रोजी त्रिभुवन सहकार विद्यापीठातील संशोधन तथा शिक्षण / प्रशिक्षणाद्वारे सहकारी संस्थामध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणे, 16 नोव्हें. रोजी सहकाराच्या माध्यमातून ग्रामिण विकासाला बळकटी देणे, 17 नोव्हें. रोजी राष्ट्रीय सहकार धोरण परिसंस्थांच्या माध्यमातून भारतातील सहकारी संस्थांच्या विकासासाठी पारदर्शक आराखडा / धोरण निश्चित करणे, 18 नोव्हें रोजी सहकारी उद्योजगतेद्वारे तरुण महिला आणि हस्तकला, हातमाग, कामगार आणि मस्यव्यवसाय या सारख्या दुर्बल घटकांना सक्षम बनविणे, 19 नोव्हें रोजी पर्यटन, आरोग्य, हरीत उर्जा विविध प्रकारच्या कोणत्याही संभाव्य क्षेत्रासारख्या उद्योन्मुख क्षेत्रात सहकारी संस्थाचा विस्तार करणे, 20 नोव्हें रोजी जागतिक स्पर्धामध्ये सहभागासाठी सहकारी संस्थामध्ये नवनवीन व्यवसायीक उत्तम दर्जाच्या उपक्रमाची निर्मिती करणे असे उपक्रम राबवावे, असे जिल्हा सहकार विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment