Search This Blog

Friday, 14 November 2025

अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढा


 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्ती अर्ज तातडीने निकाली काढा

चंद्रपूर, दि. 13 : केंद्र शासनाने भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शैक्षणिक सत्र 2019-20 ते 2024-25 या वर्षातील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व महाविद्यालयांना 30 नोव्हेंबर पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहेया अंतिम मुदतीनंतर प्रलंबित अर्जासाठी केंद्र हिस्सा कोणत्याही परिस्थितीत अदा करण्यात येणार नाहीत्यामुळे सर्व प्रलंबित अर्जावर डीबीटी प्रणालीद्वारे तात्काळ कार्यवाही करणे आवश्यक आहे.

             महाडीबीटी प्रणाली अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2019-20 ते 2024-25 या कालावधीतील प्रलंबित अर्ज प्राधान्याने निकाली काढण्यासाठी महाविद्यालयांमार्फत विशेष मोहीम राबविण्यात यावीत्यानुसार महाडीबीटी प्रणालीवर महाविद्यालयांच्या लॉगिन मधील होमपेज वर वरीलप्रमाणे वर्षातील प्रलंबित विद्यार्थ्यांची यादी उपलब्ध आहे.

            चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2019-20 मधील 53 अर्ज महाविद्यालय स्तरावरशैक्षणिक वर्ष 2020-21 मधील 622 अर्ज महाविद्यालय स्तरावर,  वर्ष 2021-22 मधील 387 अर्ज महाविद्यालय स्तरावरवर्ष 2022-23 मधील 630 अर्ज महाविद्यालय स्तरावरवर्ष 2023-24 मधील 103 महाविद्यालय स्तर व 281 विद्यार्थी स्तरावरवर्ष 2024-25 मधील 337 महाविद्यालयस्तर व 549 विद्यार्थी स्तरावर प्रलंबित आहेत. सदर अर्ज महाविद्यालयाच्या प्राचार्यानी तातडीने निकाली काढावेत.

महाविद्यालयांनी करावयाची आवश्यक व तातडीची कार्यवाही विद्यार्थी स्तरावर प्रलंबित अर्ज

           ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीमुळे परत पाठवले गेले आहेतअशा सर्व विद्यार्थ्यांना तातडीने महाविद्यालयाने संपर्क साधूनत्यांना अर्जातील त्रुटीची पूर्तता करून परिपूर्ण अर्ज दोन दिवसांत प्राप्त करून घेऊन मंजुरीची कार्यवाही करावीविहित मुदतीत कार्यवाही न झाल्यास आपण लाभापासून वंचित राहाल व याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील, अशा स्पष्ट सूचना विद्यार्थ्यांना द्याव्यात.

महाविद्यालय स्तरावर प्रलंबित अर्ज : महाविद्यालय लॉगिनमध्ये पहिल्या हप्त्यासाठी आणि दुसऱ्या हप्त्यासाठी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जावर कोणतीही दिरंगाई न करता महाविद्यालयाने तात्काळ तपासणी करून परिपूर्ण अर्जावर मंजूरीची कार्यवाही पूर्ण करावी.

वितरणासाठी प्रलंबित अर्ज : ज्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली नाही आणि आधार-बैंक सीडिंगमध्ये अडचणी आहेतअशा विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयाने विशेष मोहीम राबवावीया मोहिमेद्वारे विद्यार्थ्यांकडून त्यांचे आधार बैंक खाते NPCI प्रणालीद्वारे https://www.npcl.org.in/पोर्टलवरील Bharat Aadhaar Seeding Enabler (BASE) प्रणालीद्वारे संलग्न करण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करून घ्यावी आधार-बैंक संलग्नता यशस्वी झाल्याची खातरजमा झाल्यानंतरमहाविद्यालय लॉगिनमधील "Payment Failed Utility" या पर्यायामध्ये संबंधित विद्यार्थ्यांच्या नावासमोरील योग्य पर्यायावर क्लिक करून अर्ज सबमिट करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी.

              प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी सर्व महाविद्यालयांना 30 नोव्हेंबर पर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहेत्यानंतर प्राप्त होणाऱ्या अर्जावर कोणतीही कार्यवाही करण्यात येणार नाही व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास विद्यार्थी व महाविद्यालय सर्वस्वी जबाबदार राहतील, असे सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणयांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment