Search This Blog

Saturday, 29 November 2025

शासकीय हमीभावने धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी

 शासकीय हमीभावने धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी

चंद्रपूरदि. 29 :  हंगाम 2025-26 मध्ये शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत कृषि उत्पन्न बाजार समितीचंद्रपुर येथे धान खरेदी करण्यात येणार आहे. धान प्रति क्विंटल 2369 रुपये असून शासनाने दिलेल्या निकषानुसार एफ.ए.क्यु. दर्जाचा शेतमाल खरेदी केला जाईल.

सदर धान खरेदीची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे. शासनाच्या पोर्टलवर आधार प्रमाणीकरण करून बायोमेट्रिक पध्दतीने ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. त्याकरीता शेतकऱ्यांना नोंदणी साठी स्वतः हजर राहणे आवश्यक आहे. चंद्रपुर व बल्लारपुर तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी बाजार समिती खरेदी केंद्रावर आधार कार्डबँक पासबुक7/12 उतारा व मोबाईल क्रमांक या आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करून घ्यावी व शासकिय हमीभाव योजनेचा लाभ घ्यावाअसे आवाहन कृषि उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर कडून करण्यात येत आहे.

००००००

No comments:

Post a Comment