Search This Blog

Friday, 14 November 2025

एसएनडीटी महिला विद्यापीठाचे बांधकाम व बॉटनिकल गार्डनला पालकसचिवांची भेट




 



एसएनडीटी महिला विद्यापीठाचे बांधकाम व बॉटनिकल गार्डनला पालकसचिवांची भेट

चंद्रपूरदि. 14 : राज्याचे अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकसचिव बीवेणुगोपाल रेड्डी यांनी गुरुवारी विसापूर (ताबल्लारपूरयेथे निर्माणाधीन असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या (एसएनडीटीबांधकामाची प्रगती तसेच बॉटनिकल गार्डन येथे नव्याने तयार झालेल्या प्लॅनेटोरीयमला भेट देऊन पाहणी केली.

            यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजमउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामबल्लारपूरच्या तहसीलदार रेणुका कोकाटेसार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगलेएसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर क्षेत्राचे संचालक डॉराजेश इंगोलेसहायक कुलसचिव डॉबाळू राठोड उपस्थित होते.

विद्यापीठाचे बांधकाम दिलेल्या वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालकसचिव बीवेणुगोपाल रेड्डी यांनी दिल्यायावेळी त्यांनी वाचनालय आणि इंडोर स्टेडियमची पाहणी करून विद्यापीठाबाबत माहिती जाणून घेतलीयात विद्यार्थी संख्यासुरू असलेले अभ्यासक्रम आदी बाबींचा समावेश होताडॉराजेश इंगोले आणि डॉबाळू राठोड यांनी उपस्थितांना विद्यापीठाची प्रगती आणि सद्यस्थितीची माहिती दिली.

एसएनडीटी विद्यापीठाच्या ठळक बाबी : शैक्षणिक व प्रशासकीय इमारतवर्गखोल्याप्रयोगशाळाग्रंथालयसेमिनार हॉलस्टुडियोवसतीगृह इमारतग्रंथालय इमारतसभागृहकॅफेटेरियाभोजनगृहक्रीडा सुविधाअतिथीगृहसेंट्रल एक्झिबिशन हॉलकर्मचारी निवासस्थानसंरक्षण भिंत आदींचा समावेश आहे.

बॉटनिकल गार्डन येथे भेट : पालकसचिव बीवेणुगोपाल रेड्डी यांनी विसापूर येथील श्रध्देय अटलबिहारी वाजपेयी बॉटनिकल गार्डनला भेट देऊन तसेच नवनिर्माणाधीन असलेल्या प्लॅनेटोरीयमच्या कामाबाबत समाधान व्यक्त केलेयावेळी जिल्हाधिकारी विनय गौडामुख्य वनसंरक्षक रामानुजमउपवनसंरक्षक योगेश वाघाये आदी उपस्थित होते.

००००००००

No comments:

Post a Comment